Leopard Viral Video : रस्त्यावर तळ ठोकून बसला बिबट्या, वाहनधारकांमध्ये उडाली धांदल, पाहा व्हिडिओ

| Updated on: Sep 04, 2023 | 11:32 AM

Leopard Viral Video : पुणे जिल्ह्यातील बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ रस्त्यावर बसलेल्या बिबट्याचा आहे. या घटनेमुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन धारकांमध्ये त्यामुळे घबराहट निर्माण झाली होती.

Leopard Viral Video : रस्त्यावर तळ ठोकून बसला बिबट्या, वाहनधारकांमध्ये उडाली धांदल, पाहा व्हिडिओ
Pune Leopard
Follow us on

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्यांना जंगलांमध्ये भक्ष्य मिळत नसल्यामुळे ते गावाकडे धाव घेतात. गावातील अनेक पाळीव प्राण्यावर काही प्रसंगी ग्रामस्थांवर हल्ले करतात. त्यानंतर वनविभाग त्या बिबट्यांना पकण्यासाठी पिंजरे लावतात. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत असे प्रकार दिसतात. आता रस्त्यावर बसलेल्या बिबट्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातील हा व्हिडिओ आहे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

पुणे जवळ असणाऱ्या दिवे घाटात रविवारी भरदिवसा बिबट्या दिसला. हा बिबट्या रस्त्यावर बसलेला होता. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. व्हिडिओत रस्त्यावरील वाहने हळहळू जात असल्याचे दिसत आहे आणि बिबट्या थाटात रस्त्यावर बसला आहे. चारचाकी वाहने सरळ निघून जात आहे. परंतु दुचाकी वाहन धारकांची मात्र धांदल उडत आहे. या घटनेची माहिती लोकांनी त्वरित वनविभागाला दिली.

हे सुद्धा वाचा

का बसला होता बिबट्या रस्त्यात

बिबट्या घाटातील रस्त्यात बसलेल्या अवस्थेत लोकांना दिसला. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काही दुचाकीस्वरांनी त्याला जवळून पाहिले. या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तो जखमी झाला असल्याचे वनविभागाने सांगितले. काही वेळाने तो घाटाच्या खालच्या बाजूने मस्तानी तलावाकडे गेल्याचे सांगितले. बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला. परंतु तो सापडला नाही.

पुन्हा घेणार बिबट्याचा शोध

जखमी झालेल्या त्या बिबट्याचा शोध पुन्हा घेण्यात येणार आहे. त्या बिबट्याला शोधून त्याच्यावर उपचार करुन त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सासवडचे वनविभागाचे प्रमुख व्ही . एस. चव्हाण यांनी सांगितले. परंतु रस्त्यावर बिबट्या असल्याची बातमी दिवे घाटातील वाहनधारकांमध्ये पसरली आणि घबराहट निर्माण झाले आहे. वाहनधारक आता घाबरुनच प्रवास करत आहे.