पुणे | 14 सप्टेंबर 2023 : शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन गट झाले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटांमध्ये शिवसेना विखरली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनेही एकनाथ शिंदे यांचा गटात प्रवास केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते कोणत्या गटात जाणार? याची काही माहिती अद्याप दिलेली नाही.
पुणे शहरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेचे उपशहर प्रमुख होते. गेल्या काही दिवसांपासून राजाभाऊ भिलारे नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी केली जात होती. मात्र, बुधवारी तातडीने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुण्यात एकनाथ शिंदे गटाने विश्वासू मोहरा गमवला आहे. आपण कोणाच्या ही बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशची जबाबदारी राजाभाऊ भिलारे यांच्यावर होती. ते या संस्थांचे प्रचार आणि प्रसारचे काम करत होते. राजाभाऊ भिलारे हे शिंदे गटात सामील होणारे पुणे शहातील पहिले शिवसैनिक होते. परंतु आता ते शिवसेनेतून बाहेर पडले आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात? याकडे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपण शिवसेनेचे काम सुरु केले होते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणूनच आपण काम करत होतो. हे काम करताना पदाधिकारी म्हणून मान, सन्मान, अपमान सर्व सहन केले. मी हे काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करावे, असे राजाभाऊ भिलारे यांनी म्हटले आहे.