पुणे बनले असुरक्षित शहर, मॉर्निंग वॉकला गेले अन् टोळक्यांच्या हल्ल्यात जीव गमावून बसले

| Updated on: Jun 15, 2024 | 1:07 PM

Pune Crime News: समीर रॉय चौधरी यांच्याकडे चौघांनी पैशांची मागणी केली. त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

पुणे बनले असुरक्षित शहर, मॉर्निंग वॉकला गेले अन् टोळक्यांच्या हल्ल्यात जीव गमावून बसले
समीर रॉय चौधरी
Follow us on

पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. टोळीयुद्धाच्या बातम्या येतात. सर्वाधिक सुरक्षित शहर असलेले पुणे शहरात आता काय चाललंय? असा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना पडला आहे. कारण पुणे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरलाय नाही. पुणे शहरात सकाळी मॉर्निंग वॉक बाहेर निघालेल्या व्यक्तीला आज शेवटचा दिवस असणार? अशी कल्पनाही नसणार. सांस्कृतिक पुण्यात दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला. पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात हा हल्ला झाला. त्यात ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. समीर रॉय चौधरी असे त्यांचे नाव आहे. आता या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील तीन अल्पवयीन आरोपी आहेत.

काय घडला प्रकार

समीर रॉय चौधरी सकाळी घरुन मॉर्निंग वॉकसाठी निघाले. ते टाटा कंपनीतून सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी, १३ जून रोजी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेले चार जणांचे टोळके बाहेर पडले होते. या टोळक्याला आणखी दारू हवी होती. त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले.

दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

तीन आरोपी अल्पवयीन

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याचा समावेश आहे. इतर तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. मागील आठवड्यातच ज्युव्हीनाईल कोर्टाने त्या दोघांची बाल निरीक्षण गृहातून जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्हे हा चिंतेचा विषय बनला आहे.