पुणे | 20 जुलै 2023 : सर्वसामान्य व्यक्तीने जिद्द, मेहनत करण्याची तयारी ठेवली तर यश त्याला मिळू शकतो. त्यासाठी हवी नवे आव्हान स्वीकारण्याची अन् गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचे धाडस. मुळची पुणेकर असलेल्या युवतीने याबळावर यशाचे मोठे शिखर गाठले. शून्यातून 75 हजार कोटींपर्यंत साम्राज्य उभे करण्यापर्यंत तिचा प्रवास होता. तिची स्वत:ची संपत्ती चार हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. नेहा नारखेडे या मराठमोळ्या मुलीची यशोगाथा आहे. परंतु वर्षभरात 8600 कोटी रुपये तिने गमावले.
नेहा नारखेडे हिचा जन्म पुणे शहरात झाला. शालेय शिक्षणाबरोबर उच्च शिक्षणही पुण्यात झाले. त्यानंतर 2006 मध्ये संगणक शास्त्राची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तिने अमेरिका गाठले. जार्जिया विद्यापीठातून पदवी घेतली. आधी नोकरी केली. त्यानंतर स्वत:ची कंपनी उभारली. देशातील सर्वात कमी वयाची उद्योगपती होण्याचा मान तिच्याकडे आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनीची तिने स्थापना केली. फोर्ब्सने तिचा समावेश अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला म्हणून केला. नेहा सॉफ्टवेयर कंपनी कॉन्फ्लुएंट अँड फ्रॉड डिटेक्शन कंपनी ऑसिलरची सहसंस्थापक आहे.
2014 मध्ये लिंकेडीनमधील दोन सहकाऱ्यांसोबत नेहा नारखेडे हिने आपली कंपनी सुरु केली. या कंपनीचे मूल्य जवळपास ९.१ बिलियन डॉलर झाले होते. तिच्या कंपनीचा 2021 मध्ये आयपीओ आला होता. परंतु 2022 हुरुन रिच लिस्टने तिच्या संपत्तीत मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. तिच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. आता तिची संपत्ती 4,700 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. वर्षभरात संपत्तीत 8,600 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
नेहा एक ओपन सोर्स मॅसेजिंग सिस्टम अपाचे काफ्काची सह-निर्माती आहे. लिंकेडीनमध्ये असताना अपाचे काफ्का तिने डेव्हलप केले. 2014 मध्ये नेहाने कॉन्फ्लुयंट ही कंपनी सुरु केली. कॉन्फ्लुयंट एक क्लाउड सॉल्यूशन देणारी कंपनी आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेस करण्यासाठी मदत करते.
ही ही वाचा
पुणेकर असलेल्या या महिलेला भेटा, तिने कसे उभारले 75 हजार कोटींचे साम्राज्य