घरी बसून केली शेतमालाची विक्री अन् पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने मिळवले लाखो रुपये

| Updated on: Jul 17, 2023 | 1:41 PM

Pune farmers : शेतीमालामध्ये सध्या टोमॅटोची चर्चा सुरु आहे. कारण टोमॅटोला कधी नव्हे इतका भाव आला आहे. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांने आणखी एक फंडा केला आहे.

घरी बसून केली शेतमालाची विक्री अन् पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने मिळवले लाखो रुपये
farmer agriculture products
Follow us on

पुणे | 17 जुलै 2023 : शेती करणे हा सर्वात अवघड व्यवसाय आहे. कारण शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो. रात्रंदिवस राब राब राबतो. घाम गाळून पीक काढतो. मग शेतात माल बाजारात नेतो, तेव्हा भाव मिळत नाही. बऱ्याच वेळा त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. कधी शेतकऱ्यांना आपला शेतमाल फेकून द्यावा लागतो. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने, नव्या आशेने शेतकरी शेती करतो. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्यांने आपला वेगळा फंडा वापरत घरी बसून शेतमाल विकला आहे. त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.

काय केला फंडा

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेतकरी महादेव बराल याने कोरोना काळात वापरलेला फंडा सुरु केला आहे. त्याने घरी बसून आपला शेतमालाची विक्री केली आहे. त्यासाठी त्याने ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला आहे. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म ॲमेझॉनच्या माध्यमातून त्याने विक्री सुरु केली. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

कोणत्या शेतमालाची केली विक्री

महादेव बराल या शेतकऱ्याने जांभळांची विक्री केली आहे. त्यांनी तीन टनापेक्षा जास्त जांभळे ॲमेझॉनच्या माध्यमातून विकली आहेत. शहरांमध्ये जांभळांचा दर कमीत कमी २०० रुपये किलोपर्यंत आहे. त्याचा पूर्ण फायदा महादेव बराल यांनी घेतला. महादेव यांची मुले अविनाश आणि अमर यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. शेतीमाल विक्रीची नवीन पद्धत सुरु केली. त्यासाठी त्यांनी ॲमेझॉनशी करार करुन जांभळांची विक्री केली.

हे सुद्धा वाचा

आधी मिळत होता हा भाव

शेतकरी महादेव बराल यांनी पुणे, मुंबई, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जांभळांची विक्री केली आहे. त्यावेळी त्यांना 120 रुपये ते 140 रुपये प्रती किलो दर मिळाला. परंतु ॲमेझॉनशी करार केल्यानंतर त्यांना 200 ते 280 रुपये किलोने दर मिळाला. अनेक मोठ्या मॉल्समध्ये त्यांची जांभळे विक्रीसाठी आहेत. ग्राहकांनाही चांगल्या दर्जाची जांभळे घरी बसून मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही खूश आहेत.

ही वाचा…

टोमॅटो विक्रीतून शेतकरी झाला करोडपती, यंदा किती केली होती लागवड