पुणे शहरात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात फायर अलार्म वाजला अन् सुरु झाली धावपळ, शेवटी…

| Updated on: Mar 09, 2024 | 9:06 AM

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे. या सर्व ईव्हीएम मशीनची तपासणी करुन सुरुक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी गोडाऊनमधील फायर अलार्म वाजू लागला. त्यासंदर्भात आता स्पष्टीकरण आले आहे.

पुणे शहरात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात फायर अलार्म वाजला अन् सुरु झाली धावपळ, शेवटी...
समजा तुम्ही भोवरा चिन्ह असलेल्या व्यक्तीला मतदान केलं., ते मतदान त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही., यासाठी मतदानाच्या 5 सेकंदानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर एक पावती जनरेट होते. त्यात आपण जे बटण दाबलं, त्यालाच ते गेलंय याची खातरजमा केली जाते.
Follow us on

अभिजित पोते, पुणे | दि. 9 मार्च 2024 : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे. या सर्व ईव्हीएम मशीनची तपासणी करुन सुरुक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी गोडाऊनमधील फायर अलार्म वाजू लागला. मोठा बंदोबस्त आणि सुरक्षा असलेल्या ठिकाणी अचानक सायरन वाजू लागला. यामुळे सुरक्षा रक्षकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. परंतु हा प्रकार वेगळाच निघाला.

गोदामात काय झाले? का वाजला अलार्म

Evm मशीन ठेवलेल्या गोदामला आग लागली नाही. त्यानंतर अलार्म वाजला. त्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. या तपासणीनंतर तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यासाठी परवानगी घेण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधींची उपस्थित दुरुस्ती करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही

ईव्हीएम यंत्रणा ठेवलेल्या ठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्ती प्रकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबींबाबत अहवाल मागवला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले आहे.