Pune Festival : यंदा पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते, फडणवीसांचीही उपस्थिती राहणार, तर हेमा मालिनींची गणेशवंदना

| Updated on: Aug 23, 2022 | 5:28 PM

शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रिडा मंच, नेहरू हॉल, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी पुणे फेस्टिव्हल नागरिकांसाठी विनामूल्य असेल, असंही आयोजकांनी सांगितल आहे. या फेस्टिव्हलची सांगता 9 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे मुख्य संयोजक सतीश देसाई यांनी दिलीय.

Pune Festival : यंदा पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते, फडणवीसांचीही उपस्थिती राहणार, तर हेमा मालिनींची गणेशवंदना
पुणे फेस्टिव्हल फाईल फोटो
Image Credit source: Google
Follow us on

अभिजित पोटे, पुणे : शहराच गौरव असणारा पुणे फेस्टिव्हल (Pune Festival) यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यंदा या सोहळ्याचं 34वं वर्ष आहे. यावेळी पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन 2 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असतील. त्यासोबतच राज्याचे पर्यटन व पर्यावणमंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तसंच अभिनेता सुनील शेट्टी यांचीही उपस्थिती या सोहळ्यात असेल. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये हेमामालिनी यांची गणेश वंदना होईल. पुण्यातील ज्या गणेश मंडळांना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा गणेश मंडळांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे, तशी माहिती आयोजकांनी दिलीय. शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रिडा मंच, नेहरू हॉल, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी पुणे फेस्टिव्हल नागरिकांसाठी विनामूल्य असेल, असंही आयोजकांनी सांगितल आहे. या फेस्टिव्हलची सांगता 9 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे मुख्य संयोजक सतीश देसाई यांनी दिलीय.

पुणे फेस्टिव्हलसाठी सुरेश कलमाडी 10 वर्षांनी महापालिकेत

पुणे फेस्टिव्हलही मूळ संकल्पना काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची होती. कलमाडी यांनी आपल्या काळात पुणे फेस्टिव्हलचा दर्जा आणि चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. मात्र, पुणे कॉमनवेल्थ गेम घोटाळ्यात कलमाडी यांचं नाव आलं आणि त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. तेच कलमाडी तब्बल एका दशकानंतर 5 ऑगस्टला पुणे महापालिकेत आले. एकेकाळी राजकारणात दरारा असलेल्या कलमाडींना आज ओळखणही अवघड झालं होतं. पण कलमाडी पालिकेत आल्याची बातमी पसरताच महापालिकेत कलमाडी काळाच्या चर्चा रंगल्या होत्या.

राष्ट्रकूल स्पर्धेतील घोटाळा आणि राजकाणाला उतरती कळा

2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता. कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर केला जात आहे. हे प्रकरण प्रचंड गाजले, या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. 26 एप्रिल 2011 ला त्यांना इतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास दहा महिने कारावासात होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. पुढे कलमाडी कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.

मात्र, आज जवळपास 10 वर्षानंतर कलमाडी पुणे महापालिकेत आले. हातात काठी टेकवत आलेल्या कलमाडींना अनेकांनी पटकन ओळखलही नाही. पण कलमाडी महापालिकेत आलेत ही बातमी पसरताच अनेकांना कलमाडींचा काळ आठवला.