Pune Fire : पुण्यात तीन गोडाऊनला भीषण आग, घटनास्थळी 20 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

| Updated on: Jun 18, 2023 | 12:09 PM

Pune Fire : पुण्यात पुन्हा मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आता ही आग कोंढवा परिसरात लागली आहे. या भागात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्याजवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे.

Pune Fire : पुण्यात तीन गोडाऊनला भीषण आग, घटनास्थळी 20 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे. आगीमुळे धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. रविवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास लागलेली आग आहे. या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.

पुण्यात सकाळी ८.३० च्या सुमारास लागलेली आग दुपारी १२ वाजता नियंत्रणात आली. अग्निशमन दलाने
आगीपूर्ण विझवली अन् कुलिंगचे काम वेगाने सुरू केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मागील आठवड्यात लागली होती आग

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही मोठी आग लागली होती.

हे सुद्धा वाचा

 

आगीच्या या घटनानंतर मागील आठवड्यात मध्यरात्री एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. दोन मजले असणाऱ्या मार्केट यार्डमधील हॉटेलमध्ये ही आग लागली होती. आता १८ जून रोजी सकाळी कोंढव्याजवळील गंगाधाम परिसरातील आईमाता मंदिराजवळ आगीची घटना घडली आहे. एकूण तीन गोडाऊनला ही आग लागली आहे.

Pune Fire

20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

अग्निशमन दलाकडून 20 वाहने घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे. परंतु आगीने रौद्ररुप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. या भागातील विविध प्रकारच्या ३ गोडाऊनला ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Pune Fire

यापूर्वी वाघोलीत काय झाले होते

पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला मे २०२३ मध्ये भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.