पुणे : पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. Pune fire news Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire broke out fourteen dead
मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.
या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41 कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून कुलिंग काम सुरु असल्याची माहिती आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 15 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 18 कर्मचारी आग लागली त्यावेळी अडकले होते. त्यामध्ये 15 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
संबंधित बातम्या:
Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती
Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?
Pune fire news Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire broke out fourteen dead