पुणे : पुणे शहरात तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी आता जास्त पैसै मोजावे लागणार आहे. पुणे शहरातील घरे महागणार आहे. जर तुम्ही आता घर खरेदीचा निर्णय घेतला नाही, तर पुणेकर होण्याचे स्वप्न स्वप्नच राहू शकते. कारण
येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वाढीव दराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. तो मान्य झाल्यास गेल्या काही वर्षातील ही सर्वाधिक वाढ असणार आहे.
किती वाढणार दर
नवीन आर्थिक वर्षापासून पुणे शहरातील घरे महाग होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क विभागाने सन २०२३-२४ साठी वाढीव दराचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये पुणे शहरात 8 ते 15 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 ते 15 टक्के तर ग्रामीण भागात 5 ते 7 टक्के दर वाढ प्रस्ताव आहे. रेडी रेकनर दर 1 एप्रिल 2023 बदलले जात असतात. रेडी रेकनरच्या वाढीव प्रस्तावाला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. परंतु हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुण्यातील घरांच्या किमती वाढणार आहेत.यामुळे पुणे शहर आणि परिसरातील घरांच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत.
कसे झाले बदल
पुण्यात 2018-19 आणि 2019-20 मध्ये रेडी रेकनरचे दर हे स्थिर होते. त्यात काहीच बदल केला गेला नव्हता. त्यानंतर 2020-21 मध्ये 1.25 टक्के तर 2021-22 या वर्षात 5 टक्के दरवाढ केली. तो कोरोनाचा काळ होता. पुन्हा 2022-23 या आर्थिक वर्षात 9.2 टक्के दर वाढ झाली. आता तब्बल 15 टक्के दरवाढ प्रस्तावीत आहे. ही दरवाढ लागू झाली तर आजपर्यंची ही सर्वात मोठी दरवाढ असेल.
का आले महत्व
पुरंदरमध्ये विमानतळ होणार आहे. तसेच रिंग रोड, मेट्रो, महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. त्यामुळे पुणे शहराजवळील ग्रामीण भागातील जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. याचा देखील परिणाम घरांच्या किंमतीवर होऊन घरांच्या किंमती वाढणार आहेत.
पुणे शहरात विक्रमी दर
पुणे शहरातील भूखंड विक्रीचा यंदा विक्रम झाला आहे. सण 2022 मध्ये अडीच हजाराहून जास्त जणांनी भूखंड खरेदी केली आहे. एकूण 2582 पुणेकरांकडून नवीन जमिनीची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे शहरात गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीची खरेदी झाली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे जमिनीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
पुणे शहरातील भूखंडांना सोन्यासारखी झळाळी, दहा वर्षात जमीन खरेदीचा यंदा विक्रम..वाचा सविस्तर…