गौतमी पाटीलचा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात, काय झाले नेमके वाचा

| Updated on: May 31, 2023 | 2:21 PM

Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करणे आयोजकांना चांगलेच महागात पडले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा कार्यक्रम झाला, परंतु पुढील कारवाई पोलिसांनी केली.

गौतमी पाटीलचा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात, काय झाले नेमके वाचा
Gautami Patil
Follow us on

रणजित जाधव, खेड, पुणे : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण झाले आहे. तसेच राज्यातील अनेक भागात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केले जात आहे. आता राज्यातील एक जिल्हा नसेल तिथे गौतमीचा कार्यक्रम झाला नाही. गावाशिवातही गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. गावातील कोणताही कार्यक्रम असला की त्यानिमित्ताने गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. गौतमीची क्रेझ एवढी वाढलीय की आता तर काही मंडळी स्वत:च्या, नातेवाईकाच्या, मुलांच्या, पत्नीच्या वाढदिवसानमित्तानेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करत आहे. आता पुणे जिल्ह्यात आमदाराच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. परंतु आयोजकांना हा कार्यक्रम महागात पडला.

काय झाले

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाकणच्या मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रम घेतला होता. यामुळे आयोजक समीर गवारे, आनंद गवारे आणि विश्वनाथ गवारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी दाखल झाला गुन्हा

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ज्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आली त्याच बर्थडे बॉय असलेल्या अमित शंकर लांडे आणि आयोजक मयूर रानवडे यांच्यावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकरणी अमित लांडे आणि आयोजक मयूर रानवडे या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील अमित लांडे यांनी जाहीर कार्यक्रम घेतला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला विरारमध्ये तुफान गर्दी झाली होती. विरारच्या खार्डी गावचे प्रभाकर पाटील यांनी आपल्या घराच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रम २५ मे रोजी ठेवला होता. हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात आणि शांततेत पार पडला. परंतु त्यानंतरही आयोजकावर गुन्हा दाखल झाला. परवानगीच्या अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी भादवी कलम 188 अन्वेय आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाची परवानगी 10 वाजेपर्यंत असताना रात्री 11 च्या नंतर सुद्धा कार्यक्रम सुरूच ठेवल्याने मांडवी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.