पुणे | 16 सप्टेंबर 2023 : हुंडा घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. परंतु अजूनही सर्रास अनेक ठिकाणी हुंडा घेतला जातो. हुंडा प्रथा अजूनही पूर्ण नष्ट होऊ शकली नाही. हुंड्यासाठी अनेक महिलांच्या मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुणे शहरातील स्मिता घुगे या गिर्यारोहकला हुंडा प्रथेला समोरे जावे लागले. स्मिताच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी झाली. तिने हुंडा देण्यास स्पष्ट विरोध केला. तिने मग या प्रथेचा विरोध आपल्या पद्धतीने केला. त्यासाठी तिने चक्क माऊंट एव्हरेस्ट गाठले. एका मुलाखतीत स्मिताने हा सर्व प्रकार सांगितला.
घरात स्मिताच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. तिच्यासाठी एक स्थळी आले. दोन्ही परिवार एकमेकांना भेटले. त्यानंतर स्मिताच्या घरी मुलाच्या परिवारातून फोन आला. त्यांनी सांगितले की, माझ्या भावाने हुंड्यात २० लाख रुपये घेतले. तुम्ही २० नाही तर १८ लाख हुंडा द्यावा. स्मिताने त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी बैठक करुन कमीजास्त करण्याची तयारी दर्शवली. परंतु स्मिताने हुंडा म्हणून आपण एक रुपया देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
मुलाखतीत स्मिता म्हणते, लग्नसाठी मला अनेक स्थळे येत होती. परंतु सर्वांकडून हुंडा मागितला जात होतो. नाहीतर उंची लहान आहे, असे कारण सांगितले जात होते. मग तिने पदवीत्तर पदवी घेतली. त्यानंतर रिजेक्शन मिळत होते. मग आपल्यातील कमकरता दूर करण्याचा निर्णय तिने घेतला. याविरोधात सात महाद्विपामधील सर्वात उंच पर्वातावर अभियान करण्याचा निर्णय तिने घेतला. तिने गिर्यारोहण सुरु केले.
स्मिताने रशिया, आफ्रिकेतील उंच पर्वतावर चढाई केली. आपल्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकून गिर्यारोहण पूर्ण केले. अगदी उणे २५ ते उणे ३५ डिग्री तापमानात चढाई केली. माऊंट एव्हरेस्ट गाठले. आपल्या मोहिमेनंतर एका सार्वजिनक कार्यक्रमात स्मिता सहभागी झाली. त्याठिकाणी इतर मुलीही तिल्या भेटल्या. त्यांनी आपली अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.