Pune Gold Rate | पुण्यात सोनं ‘हाफ सेंच्युरी’च्या उंबरठ्यावर! चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

| Updated on: Aug 26, 2021 | 1:11 PM

गेल्या आठवड्यात तीन दिवस सतत घसरल्यानंतर या आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) दरात पुन्हा एकदा वाढ पहायला मिळत आहे. पुण्यातही आज सोन्याच्या दरात वाढ (Pune Gold Rate) झाली आहे. सोनं 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलं आहे.

Pune Gold Rate | पुण्यात सोनं हाफ सेंच्युरीच्या उंबरठ्यावर! चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोनं
Follow us on

पुणे : गेल्या आठवड्यात तीन दिवस सतत घसरल्यानंतर या आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) दरात पुन्हा एकदा वाढ पहायला मिळत आहे. पुण्यातही आज सोन्याच्या दरात वाढ (Pune Gold Rate) झाली आहे. सोनं 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलं आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 49,920 हजारांच्या घरात गेला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 49,450 रुपये प्रतितोळा आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 45,490 रुपये आहे. (gold prices have risen while silver prices declined today in pune)

चांदीच्या उसळीला ब्रेक

गेले तीन ते चार दिवस सातत्याने वाढत असलेल्या चांदीच्या दरात मात्र, आज घसरण झाल्याचं दिसत आहे. आज पुण्यात चांदीच्या दरात किलोमागे 200 रुपयांची घसरण झाली आहे. आज पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 200 रुपये आहे.

तीन-चार दिवस चांदीच्या दरात विक्रमी वाढ

काल पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली होती. काल पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 400 रुपयांवर गेला होता. तर परवा हा दर 62 हजार 800 रूपयांच्या घरात होता. परवाही पुण्यात चांदीच्या दरात प्रतिकिलो 800 रुपयांची वाढ झाली होती तर सोमवारी 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांत चांदीचा दर तब्बल 1700 रुपयांनी वाढला होता. मागच्या अनेक दिवसांतली ही मोठी वाढ आहे.

घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कसे कमवायचे?

जर तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवायचे ठरवले तर तुम्हाला लॉकरचे शुल्क भरावे लागेल. तुमच्या घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून तुम्ही अधिक पैसे कमावू शकता, असा एक मार्ग आहे. तुम्ही निष्क्रिय सोने RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेअंतर्गत (Gold Monetisation Scheme) ही सुविधा उपलब्ध आहे. हे बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे, जिथे तुम्ही तुमचे घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य जमा व्याजासह परत मिळते.

‘या’ बँका सेवा देताहेत

अलीकडे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटरवर लिहिले, “तुमच्याकडे असलेल्या निष्क्रिय सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर (idle lying gold jewellery) जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% मिळवा. या योजनेंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.

इतर बातम्या :

FD धारकांना मोठा धक्का, ‘या’ सरकारी बँकेकडून व्याजदरात 10 बेसिस पॉइंटची कपात

TRAI ची नवी सेवा: तुमच्या आधारवरून किती मोबाईल सिम जारी केले? आता चुटकीसरशी तपासा

रिझर्व्ह बँकेचा ‘या’ सहकारी बँकेला दणका; नियम मोडल्याने ठोठावला 15 लाखांचा दंड