…तेव्हा तर अमोल कोल्हे भेकाडासारखे पळून गेले होते; हसन मुश्रीफ यांनी ‘तो’ प्रसंग सांगितला

| Updated on: Jan 05, 2024 | 10:39 AM

Hasan Mushrif on Amol Kolhe and Jitendra Awhad : हसन मुश्रीफ यांचा अमोल कोल्हेंवर निशाणा... हसन मुश्रीफ यांनी जुना प्रसंग सांगितला... म्हणाले, तेव्हा तर... जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामांबद्दलच्या विधानावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय. रोहित पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय.

...तेव्हा तर अमोल कोल्हे भेकाडासारखे पळून गेले होते; हसन मुश्रीफ यांनी तो प्रसंग सांगितला
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी- पुणे | 05 जानेवारी 2024 : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चॅलेंज दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अन् कोल्हे यांना पाडणार असा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखवला. त्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. अशातच आता अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक जुना प्रसंग सांगितला आहे. अमोल कोल्हे काही दिवसांआधी मला म्हणाले होते की, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मी राजकारण बंद करणार आहे आणि तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

आव्हाडांच्या वक्तव्यावर मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक विधान केलं. प्रभूराम मांसाहारी असल्याचं आव्हाड म्हणाले. त्यानंतर प्रचंड वाद झाला. त्यावरही हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येकाच्या आस्थेची भावना असते. त्यामुळे असं बोलणं टाळलं पाहिजे. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे, असं मुश्रीफांनी म्हटलं.

अजित पवार गटातील नेत्यांना गाड्या देणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावरही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचं मला माहिती नाही. गाड्या कधी देणार कोण देणार हे मला माहिती नव्हतं, असं मुश्रीफ म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा फोन टॅप केला नव्हता. त्यामुळे संबंधित नेत्यांना प्रश्न विचारा, असं मुश्रीफ म्हणाले.

ललित पाटील प्रकरणावर मुश्रीफ म्हणाले…

आज ससूनमध्ये जिल्हा नियोजन आणि इतर विभागातील आढावा घेणार आहे. तृतीयपंथी वॉर्डचे देखील आज उद्घाटन या ठिकाणी होत आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली आहे. ललित पाटील प्रकरणावरही मुश्रीफ यांनी आपलं मत मांडलं. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे. समितीने जे सांगितलं आहे. त्यानुसार डॉ. प्रवीण देवकाते यांच्यावर कारवाई झाली आहे, असं त्यांनी म्हटलं.