Pune | पुण्यात कोणत्या भागात झाली एवढी ट्रॅफीक जाम?

| Updated on: May 04, 2023 | 8:56 PM

पुण्यात नागरिकांकडून वाहतूक कोंडीवरुन अनेकदा मनस्ताप व्यक्त केला जातो. पण या वाहतूक कोंडीवर पर्याय मात्र सापडताना दिसत नाही. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा तासंतास एकाच ठिकाणी वाहनात बसण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवते.

Pune | पुण्यात कोणत्या भागात झाली एवढी ट्रॅफीक जाम?
Follow us on

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा टीका-टीप्पणी केली जाते. नागरिकांकडून वाहतूक कोंडीवरुन अनेकदा मनस्ताप व्यक्त केला जातो. पण या वाहतूक कोंडीवर पर्याय मात्र सापडताना दिसत नाही. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा तासंतास एकाच ठिकाणी वाहनात बसण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवते. शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी तर मुबई-पुणे महामार्गावर असणारी वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेष म्हणजे अगदी मध्यरात्रीही ही वाहतूक कोंडी असते. आतादेखील पुण्यातला वाहतूक कोंडीचे धक्कादायक दृश्य समोर आले आहेत.

पुणे आणि वाहतूक कोंडी हे नवं समीकरणच बनलं आहे. विशेष म्हणजे जगभरात पुण्यातील वाहतूक कोंडी पोहचलीच आहे. अशातच जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडीत पुन्हा एकदा अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झालीय. या कोंडीत आयटी वर्ग फसलेला आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांकडून मनस्ताप व्यक्त केला जातोय. या वाहतूक कोंडीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संबंधित व्हिडीओत पाहिल्यावर वाहतूक कोंडी किती भीषण आहे याचा अंदाज येतोय.

वाहतूक कोंडीचं नेमकं कारण काय?

वाहतूक पोलिसांच्याच फसलेल्या नियोजनामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झालीय. भूमकर चौकातील नित्याची झालेली कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इथं वन वे केलाय. वन-वे चा हाच प्रयोग याआधी फसला असताना वाहतूक पोलिसांनी पुन्हा तोच घाट घातला आणि परिणामी आधीपेक्षा कैक पटीने जास्त वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या तीन दिवसांपासून अशीच परिस्थिती उद्भवत असताना, वाहतूक पोलिसांकडून फसलेला वन-वे प्रयोग रेटला जातोय. आयटी वर्गाने ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी सोशल मीडियावर पोस्ट केल्यास, ही वाहतूक जगभरात नक्कीच पोहचेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. याशिवाय अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणी असतात. विशेष म्हणजे संध्याकाळची वेळ ही कार्यालयीन कामकाज संपण्याची वेळ. शेकडो नागरीक आपल्या ऑफिसचं काम आटोपून यावेळी घराच्या दिशेला निघतात. पण अशावेळी नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे हा त्रास रोजचाच असल्याने नागरीकही हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या समस्येवर कधी मार्ग निघेल? हा मोठा प्रश्न आहे.