पुणे जिल्ह्यात पौड गावाजवळ एक खासगी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हे हेलीकॉप्टर एका खासगी विमान कंपनीच होतं. मुंबईहून हैदराबादला हे हेलिकॉप्टर चाललेलं. हेलीकॉप्टरमध्ये 4 लोग होते. पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना ही घटना घडली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची एसपींनी माहिती दिली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर होतं. मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॅाप्टर चाललं होतं. पायलट आणि तीन प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलीकॉप्टर दुर्घटनेत प्रवासी जखमी झाले आहेत. हेलीकॉप्टरमध्ये असलेल्या चौघांपैकी कॅप्टन जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तिघांची प्रकृती स्थिर आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात आज मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे. दुर्घटनेमागच अधिकृत कारण अजून समोर आलेलं नाही. AW 139 या हेलिकॉप्टरच नाव आहे. हेलीकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वीडियोमध्ये दिसतय, हेलीकॉप्टरच संतुलन बिघडल्यानंतर ते एका शेतात जाऊन पडलं. दुसऱ्या वीडियोमध्ये स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळावर मदत करताना दिसतय.
आनंद या हेलिकॉप्टरचे कॅप्टन होते. ते जखमी झाले आहेत.
या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय.
दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
एस पी राम (प्रकृती स्थिर)
सदर हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला चाललं होतं. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच हे हेलिकॉप्टर होतं.