आरोपाचा डाग पुसण्यासाठी आमदार सुनील टिंगरे Action मोडवर, थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र

| Updated on: May 23, 2024 | 8:03 AM

Pune Porsche accident : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव आलं होतं. ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान आता सुनील टिंगरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

आरोपाचा डाग पुसण्यासाठी आमदार सुनील टिंगरे Action मोडवर, थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र
आमदार सुनील टिंगरे यांचं पुण्यातील अपघाताच्या घटनेवर सविस्तर स्पष्टीकरण
Follow us on

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे. पैसेवाल्यांना न्याय वेगळा का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पुण्यातील विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरच्या मुलाने त्याच्या पोर्शे कारने दुचाकीस्वाराला उडवलं. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी वेदांत अग्रवाल अल्पवयीन आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे पोर्शे कार चालवत त्याने हा अपघात केला. अपघाताचा गुन्हा केल्यानंतर आरोपीला सहज जामीन मिळाला म्हणून लोक अधिक चिडले. आता बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. वेदांत 17 वर्षांचा आहे. त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते.

दरम्यान या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं. अपघातानंतर सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी केला होता. दरम्यान आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल आहे. वडगाव शेरी, कल्याणी नगर भागातील अनधिकृत पब, हॉटेल रात्री उशिरापर्यत सुरू असतात असं सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे.

पत्र लिहून काय मागणी?

या अनधिकृत पब, हॉटेलमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास होतो. अशा पब, हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्वरित कारवाई करा, अन्यथा अधिवेशनात आवाज उठवणार असं सुनील टिंगरे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

विनीता देशमुख यांनी सुनील टिंगरेंवर काय आरोप केलेला?

“सुनील टिंगरे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबलवर दबाव आणला. आरोपी वेदांत अग्रवालमुळे दोन लोकांचा जीव गेला. त्याला शांतपणे, आराम करता यावा, यासाठी पिझ्झा, बर्गर खायला दिला. एफआयआर करताना ड्रिंक अँड ड्राइव्हची कलम काढून टाकली. एफआयआर वीक केला” असा आरोप विनीता देशमुख यांनी केला.