अभिजित पोते, पुणे : एकीकडे राज्यात तापमान वाढत आहे. पुणे व राज्यातील इतर अनेक शहरांचे तापमान 40 अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता एप्रिलमध्येही पावसाचे संकट कायम आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
राज्यात पुढील 4 दिवस,येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चित्र 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे 7 एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. हे सुद्धा वाचाकृपया IMD कडील सूचना पहा.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/107Yki0Jry
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 6, 2023
कुठे पडणार पाऊस
ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
का पडतोय पाऊस
बंगालच्या उपसागरातून बाष्प वाहत असल्यामुळे हा पाऊस पडणार आहे. पुढील तीन-चार दिवस पुणे शहरासह राज्यातील काही भागात पावसाचा इशारा यामुळे दिला आहे.
अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या पार
फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे 40.4 आहे. त्यानंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये 40.2 अंश नोंदविले गेले. बुधवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता.
देशातील निम्म्याहून अधिक जनतेचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. शेतीच्या नुकसानीमुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात. शेती क्षेत्रातील कोणताही घटक असो त्यावर पावसाचा प्रभाव कायम राहिलेला आहे. शेतीच्या उत्पदनात वाढ होण्यासाठी मान्सून सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं, काही गावांना चांगलच झोडपून काढलं.साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. यावेळी नागरिकांची पावसानं मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसला आहे.
हे ही वाचा
पुणे पारा वाढला, एकीकडे ऊन तापले, दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज