Income Tax Raid | पुणे शहरासह 14 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी, पाच कोटींची रोकड जप्त

| Updated on: Sep 28, 2023 | 4:30 PM

Pune Income Tax Raid | आयकर विभागाने पुणे आणि देशातील इतर ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या छाप्यात सुमारे पाच कोटींची रोकड मिळाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर दस्तावेज मिळाले आहे. बेहिशोबी संपत्ती प्रकरणात ही कारवाई झालीय.

Income Tax Raid | पुणे शहरासह 14 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी, पाच कोटींची रोकड जप्त
income tax raid
Follow us on

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : आयकर विभागाकडून छापेसत्र सुरुच असते. आता पुणे शहरासह देशातील 14 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका समुहाच्या तीन कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत पाच कोटींची रोकड मिळाली आहे. रोकड रक्कमेची मोजणी करण्यासाठी आयकर विभागाला बँकेतून नोटा मोजण्याचा मशीन मागवावी लागली. उत्पन्नापेक्षा २० टक्के अधिक रक्कम असल्याचा आरोपावरुन हे छापेसत्र करण्यात आले. पुणे, समस्तीपूर, मधुबनी, कोलकाता, गुवाहाटीसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

कोणत्या कंपनीवर कारवाई

पोल्ट्री आणि पशुखाद्य तयार करणारे महासारिया ग्रुपवर आयकर विभागाच्या टीमने देशभर छापे मारले. त्यात पुणे येथील निवासस्थानाचा समूह आहे. बिहारमधील दरभंगा येथील ही कंपनी आहे. आयकर विभागाने दरभंगाच्या महासारिया ग्रुप आणि समस्तीपूरच्या दिव्या दृष्टी ग्रुपचे मालक अशोक मनसारिया, आनंद मंसारिया, राजकुमार मनसारिया आणि प्रकाश अनुपम यांच्या घर, कार्यालय, मिल याठिकाणी छापे टाकले. या छापेसत्रात दरभंगा, समस्तीपूर, गुवाहाटी, पुणे, कोलकाता येथील निवासस्थान आणि कारखान्यांचाही समावेश आहे.

दोन दिवसांपासून कारवाई

दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या 120 जणांच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. अशोका कॅटल अँड पोल्ट्री फीड प्रायव्हेट लिमिटेड, दरभंगा औद्योगिक, पोल्ट्री व्यवसाय समूह, पशुखाद्य निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय या कंपनीचा देशभर आहे. सकाळी झालेल्या कारवाईच्या ठिकाणी अनेक लोक झोपले होते. अचानक आयकर विभागाचे अधिकारी आल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचारी घाबरले.

हे सुद्धा वाचा

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

कारवाईच्या वेळेस आयकर विभागाने अनेक दस्तावेज जप्त केले. कंपनीने हिशोबासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला होता. अनेक माहिती पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्कमध्ये होती. तसेच पिवळ्या कागदावर लांबलचक नोंदी होत्या. हे सर्व दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहे. आता तपासाच्या आधारे आयकर पथक राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच देशातील इतर राज्यांमध्ये छापे टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.