पुणे: बोलण्याच्या ओघात ‘पुणे तिथे काय उणे’ असं आपण नेहमी म्हणत असलो तरी पुण्यात खरोखरच काहीच उणे नसल्याचं एका सर्व्हेतून सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा सर्वात आनंदी जिल्हा असल्याचं एका सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुणेकरही आता पुरावे हातात घेऊन ‘पुणे तिथे काय उणे’ असं बिनधास्तपणे म्हणून शकणार आहेत. (Pune is the happiest city in Maharashtra: Report)
मॅनेजमेंट डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूटच्या स्टॅट्रेजी मॅनेजमेंटचे प्राध्यापक राजेश पिलानिया यांनी एक अहवाल तयार केला आहे. इंडिया सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020 असं या अहवालाचं नाव आहे. त्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात आनंदी जिल्हा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर देशातील आनंदी शहरांच्या यादीत पुण्याचा 12 वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये देशातील 34 मोठ्या शहरातील 13 हजार लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
या दरम्यान द वर्ल्ड हॅपीनेसचे को-एडिटर जॉन हेलवेल, रिचर्ड फ्लोरिडा, इंडियन मॅनेजमेंट मुव्हमेंटचे संस्थापक, पद्म भूषण पुरस्कार विजेते एम. बी. अथरेया आणि जगप्रसिद्ध आर्किटेक्ट जॅमी लर्नर आदींनी हा अहवाल तयार करण्यात मदत केली आहे.
पुण्याचीच निवड का?
पुणे जिल्ह्याला आनंदी जिल्हा घोषित करण्यामागे अनेक कारणं आहेत. कोरोनावर व्हॅक्सीन तयार करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे सुद्धा त्याचं एक कारण आहे. पुणे शहर रोजगाराचं प्रमुख केंद्र आहे. पुण्याती आयटी सेक्टर देशातील दुसरं सर्वात मोठं आयटी हब मानलं जातं. अनेक आयटी कंपन्यांची कार्यालयेही पुण्यातच आहेत. पुण्यातच लष्कराच्या दक्षिणी विभागाचं मुख्यालय आहे. पर्यटनाचं केंद्र म्हणूनही पुणे प्रसिद्ध आहे. देशभरातील लोक या शहरात राहत असल्याने एक कॉस्मोपॉलिटीन शहर म्हणूनही या शहराचा बोलबाला आहे.
या गोष्टींकडेही लक्ष दिलं
आनंदी जिल्हा म्हणून निवड करताना आनंदाशी निगडीत गोष्टींवरही भर देण्यात आला. काम आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे, लोकांच्या उत्पन्नातील वाढ, त्यांचं कौटुंबीक आणि व्यावसायिक आयुष्य, त्यांचं आरोग्य, शारीरीक आणि मानसिक समाधान, लोकांच्या श्रद्धा आणि अध्यात्म, सोशल लाईफ यासह कोरोनाचा त्यांच्या मनावर आणि आयुष्यावर झालेला परिणाम आदींचाही अभ्यास करण्यात आला. त्याद्वारे पुणेकरांच्या आनंदाचं परिमाण काढण्यात आलं. या सर्व्हेत 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश करण्यात आला.
पुणेकरांना काय वाटतं?
आम्हाला पुण्यातच राह्यला आवडतं. पुण्यातच वाढलो आणि शिकलो याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईचं जीवन अत्यंत धावपळीचं आहे. त्यामानाने पुणे शांत आहे, म्हणूनच पुणे आवडतं, असं अमित नगरकर यांनी सांगितलं. नगरकर हे मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तर कोरोनाच्या काळात पुणे प्रशासनाने केलेलं काम वाखाणण्यासारखं आहे. पुण्याचं प्रशासन तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे वापर करतं. त्याचा जनतेलाच फायदा मिळतो, असं महेश पाटील यांनी सांगितलं. (Pune is the happiest city in Maharashtra: Report)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 7 January 2021https://t.co/fvkh4MICtg#Top9 #Top9News #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संबंधित बातम्या:
पिंपरीतल्या अवलियाची यशोगाथा! नोकरी गेल्याने चहाचं दुकान थाटलं; आता महिन्याला 60 हजारांची कमाई!
भरपूर फिरा, लोकांची कामे करा, पण लोकांनाच फिरवू नका; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
(Pune is the happiest city in Maharashtra: Report)