31 लाखांचे पॅकेज असणारा दहशतवादी…NIAने उघडले पुणे इसिस मॉड्यूलचे ‘राज’

| Updated on: Nov 12, 2023 | 2:59 PM

pune isis module case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. दहशवादी उच्चशिक्षित आहेत. त्यातील एकाला 31 लाखांचे पॅकेज होते. एका आयटी कंपनीत तो मॅनेजर म्हणून काम करत होतो...तसेच त्याने काही सीक्रेट कोडवर्ड तयार केले होते.

31 लाखांचे पॅकेज असणारा दहशतवादी...NIAने उघडले पुणे इसिस मॉड्यूलचे राज
NIA
Follow us on

पुणे | 12 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात इसिस मॉड्यूलमधील अतिरेक्यासंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इसिस मॉड्यूलमधील हे दहशतवादी उच्चशिक्षित आहेत. त्याला ३१ लाख रुपयांचे पॅकेज होते. तसेच एका आयटी कंपनीत तो मॅनेजर होता, अशी माहिती आरोपपत्रात एनआयएने दिली आहे. या अतिरेक्यांनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड ठेवले होते. पुणे येथील ISIS मॉड्यूल प्रकरणात सात जणांवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे.

युवकांचे माइंडवॉश करुन दहशतवादी बनवत होते

एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यासाठी त्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडले होते. जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. आयईडी बनवत होते. तसेच पुणे शहरातील अनेक भागांतील युवकांचे माइंडवॉश करुन त्यांना दहशतवादाकडे ओढत होते. मोहम्मद इमरान, मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका, आमिर अब्दुल हमीद, मोहम्मद युनुस, मोहम्मद याकूब साकी उर्फ आदिल आणि सलीम खान यांनी हे प्रकार केले होते. अली बडोदावाला आणि साकिब नाचन यामध्ये आरोपी आहे. आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता.

सिरका आणि गुलाब जल कोडवर्ड

अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता. अतिरेक्यांनी अनेक राज्यात दहशतवादी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून दुचाकीचा वापर ते करत होते.

हे सुद्धा वाचा

एका व्यक्तीला 31 लाखांचे पॅकेज

अटक केलेल्या जुल्फिकार हा एका मल्टीनेशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याला तब्बल 31 लाख रुपये वार्षिक पॅकेज होते. अटक केलेल्या सर्वच अतिरेकी उच्चशिक्षित होते. त्यातील कादीर पठाण ग्राफिक डिजाइनर होता. आयईडी बनवण्यासाठी सहज उपलब्ध होणारे थर्मामीटर, 12 वॅटचा बल्ब, फिल्टर पेपर, आगपेटी, स्पीकर वायर आणि सोडा पावडरचा ते वापर करत होते.