पुणे | 30 सप्टेंबर 2023 : राजस्थान फरार झाल्यानंतर पुणे शहरात इसिस मॉड्यूल सक्रीय करण्यासाठी काही दहशतवादी काम करत होते. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला. प्रकरणाची संवेदनशीलतेमुळे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कडे देण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील तिघांच्या मुसक्या आवरण्यासाठी एनआयएनने जोरदार कारवाई सुरु केली. या आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आता शनिवारी या प्रकरणात महत्वाची अपडेट आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील चारही आरोपींवर तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या आरोपींमध्ये मोहम्मद शहनवाज ऊर्फ शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि तालाह लियाकत खान यांचा समावेश होते. या आरोपींचे नवी दिल्ली कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर एनआयएने दिल्लीत शोध मोहीम सुरु केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे मॉड्यूल प्रकरणात सात आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. यामधील काही जणांना पुणे शहरातील कोंढवामध्ये अटक केली. तर काही जणांना मुंबई आणि ठाण्यातून अटक केली. या आरोपींनी कोंढव्यामधील एका घरात आयईडी असेंबल केले होते. तसेच इतर दहशतवाद्यांसाठी बॉम्ब तयार करण्याची कार्यशाळाही घेतली होती. या बाँबची सातारा जंगलात जाऊन चाचणी केल्याची माहिती तपास यंत्रणेच्या तपासातून उघड झाली होती.
इसिससाठी काम करणारे या आरोपींच्या ठाणे आणि पुण्यातील राहत्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्यातून देशात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा कट उघड झाला होता. या प्रकरणातील चार मुख्य आरोपी अजून मिळून आले नाही. त्यामुळे एनआयएकडून त्यांचा शोध सुरु केला गेला आहे.