जयवंत शिरतर टीव्ही 9 मराठी, जुन्नर पुणे: जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रा.डॉ. रवींद्र चौधरी यांनी पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ सापांच्या विष्ठेवर संशोधन केलं आहे. अनेक प्रतिजैविकांना प्रतिरोधक असणाऱ्या दोन नव्या जातींच्या जिवाणूंचा शोध या सापाच्या विष्टेमधून लागला आहे. जुन्नर, पुणे आणि चंदीगड येथील 4 शास्त्रज्ञांच्या पथकाने हे काम केलं आहे.आणि हे संशोधन नुकतंच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहे. (Pune Junnar Prof. Ravindra Choudhari research on Harantol snake faeces)
श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर येथे जीवशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून प्रा.डॉ.रवींद्र चौधरी कार्यरत आहेत. नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे, मायक्रोबायल टाइप कल्चर कलेक्शन आणि सी. एस. आय. आर. इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी, चंदीगड या विविध नामांकित संस्थांकडून सापांच्या विष्टेवर जे संशोधन झाले त्यातल्या संशोधकात डॉ.चौधरींसोबत सोबत पुणे येथील डॉ.योगेश सौचे, डॉ.श्रीकांत पवार,डॉ.प्रमोद माने काम करत होते.
सापांच्या विष्ठेवर झालेलं संशोधन कार्य नुकतंच पूर्ण झाले आहे. या विष्टेमधील जिवाणूंचा ओळख पटविण्यासाठीचा अभ्यास त्यांनी केलाय. मुुख्यत: विशेष म्हणजे संशोधनामध्ये नवीन जीवाणू हे सापाच्या विष्ठे मधून शोधून काढण्यात आलेले आहे. मानवांसह सर्व सजिवांमध्ये यजमानाशी संबंधित प्रजातींच्या जीवनांच्या आरोग्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. मानवावर आणि काही सामान्य जीवांवर बरेच अभ्यास केले गेले आहेत. परंतु वन्य प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांच्याबद्दल फारच कमी अभ्यास झालेला आहे. सापांशी संबंधित सूक्ष्मजंतूंचा शोध घेण्याचा हा एक अनोखा अभ्यास होता.या अभ्यासाचा पुढील काळात मोठा फायदा होणार आहे.
प्राण्यांच्या विष्ठे मध्ये असलेले जिवाणू पावसाळ्यात पाण्यामार्फत आणि हवेच्या माध्यमातून मानवाच्या आणि इतर प्राण्यांच्या संपर्कात येतात. नवीन शोधून काढलेले जिवाणू प्लॅनोकोकेसी कुटुंबातील आहेत. यातील काही प्रजाती रोगकारक आहेत. हे संशोधन स्प्रिंजर – नेचर जर्नल अँटनी व्हॅन लीऊवेनहोक मध्ये प्रकाशित झाले आहे.
सापांमधील जिवाणू ओळखणे महत्वाचे आहे कारण ते अनेकविविध रोगांस कारणीभूत ठरतात. अनेक लोक या जिवाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. सापामध्ये सापडलेल्या बहुतेक जिवाणूंच्या प्रजातीचे सार्वजनिक आरोग्यास महत्त्व आहे तसेच जगभरात संसर्ग होऊन गंभीर आजार उद्भवलेले आहेत. काही सापांमध्ये अपायकारक जीवाणू असू शकतात.
भविष्यात वन्यजीवपासून होणारे रोग टाळण्यासाठी अशा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. या संशोधकांच्या मते, प्राण्यांपासून येणारे सूक्ष्मजीव शोधणे आवश्यक आहे ज्यामुळे भविष्यात विविध मानवी रोग किंवा पुढील साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.भविष्यातील अभ्यासात सापाच्या आतड्यातील या सूक्ष्मजीवाची भूमिकेचा अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच आता आपण मनुष्य तसेच इतर प्राण्यांच्या संबंधात या जीवाणूंच्या रोगकारकतेच्या अभ्यासावर भर देणार आहोत, असं डॉ. रवींद्र चौधरी यांनी सांगितलं आहे.
Savdav Waterfall | पहिल्याच पावसात कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहितhttps://t.co/6woWWhMZ1W#Rain #RainUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
संबंधित बातम्या:
2024नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचं खोचक ट्विट
काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही
(Pune Junnar Prof. Ravindra Choudhari research on Harantol snake faeces)