पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहे. एकीकडे राज्यात भाजपचे मिशन 45 सुरु असताना पुणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय नेत्यांचे दौरै वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाही पुण्यात आले. नुकतीच संघाची राष्ट्रीय बैठक पुणे शहरात झाली. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचवेळी चांदणी चौक पुलाचे लोकर्पण करण्याची चर्चा सुरु होती. परंतु पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने ते झाला नाही. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चांदणी चौक पुलाचे लोकर्पण झाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात येत आहे.
पुणे येथील लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी मोदी पुण्यात येत आहे. पुणे विमानतळावरील विस्तारीत नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता हे टर्मिनल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोहगाव विमानतळ नवीन टर्मिनल सुरु करण्यात येणार आहे. हे टर्मिनल उभारण्यासाठी 525 कोटी रुपये खर्च आला आहे. टर्मिनलवर एरोब्रिज तयार केले गेले आहे. विमानतळावरील या टर्मिनलवर टेकऑफ आणि लॅण्डींगसाठी नव्या सुविधा विकसित केल्या आहेत. सध्या पुणे विमानतळावरुन 90 विमाने रोज जात आहे. त्यानंतर नवीन टर्मिनलवर झाल्यावर 120 विमाने रोज टेक ऑफ आणि लॅण्डीग करतील.