पुण्यातील तासांचा प्रवास मिनिटांमध्ये, हिंजवडी-शिवाजीनगर 25 मिनिटांत, प्रकल्प कधी होणार सुरु?

| Updated on: Nov 28, 2024 | 12:00 PM

Pune Metro 3 status: पुणे शहरातून हिंजवडीत जाताना या सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करत कार्यालय गाठावे लागते. पुण्यातील या मार्गाचे महत्व लक्षात घेऊन 8 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीनगर ते बालेवाडी आणि हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते.

पुण्यातील तासांचा प्रवास मिनिटांमध्ये, हिंजवडी-शिवाजीनगर 25 मिनिटांत, प्रकल्प कधी होणार सुरु?
Follow us on

Pune Metro 3 status: पुणेकर आणि वाहतुकीची कोंडी हे एक समीकरण बनले आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून पुणेकरांना वाहतूक कोडींतून दिलासा मिळत आहे. पुणे शहरातील मोजक्या भागात मेट्रो सेवा सुरु झाली आहे. त्या भागात जाणाऱ्या लोकांचा प्रवास गारेगार आणि कमी वेळेत होत आहे. आता पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याने चांगला वेग घेतला आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हा तास-दीड तासांचा प्रवास केवळ 25 मिनिटांत होणार आहे.

23 ते 25 मिनिटांत प्रवास होणार

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे 74 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे आहे, असे पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले. या मार्गावर मेट्रो सुरु करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कामाला वेग आला आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर प्रवास पूर्ण करण्यासाठी रस्ते मार्ग हा एकच पर्याय आहे. त्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र, मेट्रोमुळे पुणेकरांचा हा प्रवास 23 ते 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

असा आहे प्रकल्प

तब्बल आठ हजार तीनशे कोटी रुपयांहून अधिक खर्च असणार हा मेट्रो प्रकल्प टाटा समूहाने हातात घेतला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर 23.3 किमी मेट्रो मार्ग आहे. त्यावर एकूण 23 मेट्रो स्थानके आहेत. या मार्गावर ताशी 80 ते 85 किमी वेगाने मेट्रो धावणार आहे. एका मेट्रोत 1000 प्रवासी बसू शकतात. या प्रकल्पाचा एकूण खर्च 8300 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

हिंजवडी या भागात माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या आहेत. पुणे शहरातून हिंजवडीत जाताना या सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करत कार्यालय गाठावे लागते. पुण्यातील या मार्गाचे महत्व लक्षात घेऊन 8 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीनगर ते बालेवाडी आणि हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. मेट्रो प्रकल्प येत असल्याने बाणेर, हिंजवडी या भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.