पुणे : पुणे मेट्रोने एक आयडिया आणली आहे. परंतु मेट्रोने आपले उद्देश विसरुन आणलेली ही आयडिया पुणेकरांना रुचली नाही. यासंदर्भात पुणे मेट्रोने केलेल्या पोस्टवर पुणेकरांनी खास पुणेरी शैलीत घेरले आहे. अनेकांनी उपरोधक टीका केली आहे. आनंदाचा क्षणच कशासाठी तर हानीमून पॅकेजही सुरु करा, असे म्हणत चांगलेच फटकारले आहे. आमच्या येथे बर्थडे पार्टीसाठी ट्रेन भाड्याने मिळेल, तसेच पापड, कुरडया आणि धान्य वाळवण्यासाठी स्टेशनची गच्ची भाड्याने मिळेल. लग्नाचा मेट्रो थीम प्लान लवकरच उपलब्ध होणार, हनिमून पॅकेज लवकरच पुणेकरांच्या भेटीला येणार, दीपोत्सव, नवरात्री, दांडिया, ख्रिसमस वगैरसाठी ऑर्डर आताच बुक करा, अशा कॉमेंट केल्या आहेत.
काय आहे मेट्रोची जाहिरात
पुणे मेट्रोने आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर आनंदाच्या क्षणासाठी मेट्रोचे पॅकेज दिले आहे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, गेट-टुगेदर किंवा इतर सेलिब्रेशन आता नागरिकांना मेट्रोमध्ये सेलिब्रेट करता येणार आहेत. शंभर जणांसाठी पाच हजार रुपये शुल्क घेतले जाणार आहे. शंभर ते दीडशे प्रवाशांसाठी ७ हजार ५०० ते दीडशे ते २०० जणांसाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या जाहिरातीवरुन पुणेकर चिडले आहे. मेट्रो ही प्रवाशांसाठी आहे, तो नफा कमवण्याचा उद्योग नाही, असे म्हटले आहे.
काय म्हणतात नेटकरी
पुणे मेट्रोची वनाज ते रामवाडी हे 14.66 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही 16.59 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत. 6 मार्चला या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन झालं. मागील अनेक वर्षांपासून पुणेकर मेट्रोची वाट पाहत होते.