पुणे: पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या सहा किलोमीटर भुयारी मार्गाचे काम कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले आहे. हा मार्ग एकूण 12 किलोमीटर लांबीचा असेल. त्यापैकी 7 किलोमीटर मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. भुयारी मेट्रोसाठीचे खोदकाम निम्म्या वेळेत पूर्ण झाले आहे.
कृषी महाविद्यालयापासून या खोदकामाची सुरुवात झाली होती. भूमिगत मार्ग तयार करणारे टनेल बोरिंग मशीन आता बुधवार पेठेत पोहोचले आहे. मेट्रोच्या तांत्रिक भाषेत यास ‘ब्रेक थ्रू’ म्हटले जाते.
पुणेकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो (Pune Metro) दाखल होणार आहे. शहरात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण ही मेट्रो कशी असेल याचा पहिला लूक आता समोर आला आहे. बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातच पुणे मेट्रोचे डबे (Pune Metro Coach) बनवण्याचे हक्क खरेदी केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच मेट्रोचे कोच भारतात तयार केले जाणार आहेत.
तितागड वॅगनची (Titagarh Firema) ही तितागड फायरमा S P A ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तितागड वॅगन या कंपनीने याआधी कोलकत्ता मेट्रोसाठी 56 डबे बनवले आहेत. त्यानंतर आता ही कंपनी पुण्यातील मेट्रोसाठी ही कंपनी डबे तयार करणार आहे.
पुणे मेट्रोचा रंग हा मुंबई मेट्रोपेक्षा वेगळी आहे. ही मेट्रो सिल्वर रंगाची आहे. सिल्वर रंगासोबतच यात लाल आणि निळा रंगही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो समोरुन बघताना एक्सप्रेसप्रमाणे वाटते. पण जर मात्र या मेट्रोचा लूक विदेशातील मेट्रोप्रमाणे दिसत आहे. दरम्यान तितागड कंपनी पुणे मेट्रोचे 102 डबे बनवणार आहे.
संबंधित बातम्या:
पहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो?
अजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास