पुणे मेट्रोचे टप्पे असे वाढत जाणार की पुणेकर कुठेही मेट्रोने फिरणार… देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला पुणे मेट्रोचा विस्ताराचा प्लॅन

| Updated on: Sep 29, 2024 | 12:33 PM

pune metro shivaji nagar to swargate: पुण्यातील विस्तारीत मेट्रो वाघोली, चांदणी चौक आणि इतर भागांत होत आहे. यामुळे भविष्यात पुण्यातील कोणत्याही टोकापासून कोणत्याही टोकापर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. पुणे शहर मेट्रोने इन्ट्रीग्रेट होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे मेट्रोचे टप्पे असे वाढत जाणार की पुणेकर कुठेही मेट्रोने फिरणार... देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला पुणे मेट्रोचा विस्ताराचा प्लॅन
पुणे मेट्रो
Follow us on

pune metro shivaji nagar to swargate: पुणे शहरातील बहुप्रतिक्षेतील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पाचे उद्धघाटन रविवारी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पाचे उद्घघाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रत्यक्षात पुण्यात उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे वेगळेपण सांगितले. पुणे मेट्रोने देशातील सर्वात वेगाने पूर्ण झालेला प्रकल्प असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोचे काम २०१४ साली सुरु झाले. आपले सरकार आल्यावर या कामास गती मिळाली. पुणे मेट्रोसाठी कंपनी स्थापन केली गेली. अत्यंत वेगाने कामे सुरु करण्यात आली. देशातील सर्वात वेगाने काम पूर्ण होण्याचा मान पुणे मेट्रोच्या पहिला टप्पाला मिळाला. मेट्रो शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ही देशातील पहिली टीटीपी मोडची मेट्रो आहे. सर्वच पद्धतीने विचार करुन पुण्यातील वाहतूक मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी झाले आहे.

स्वारगेट स्टेशन पाहण्यासाठी येणार

स्वारगेट स्टेशन अर्धवट झाल्याचा आरोप होत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, स्वारगेट स्टेशन हे मल्टीमॉडल स्टेशन आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची वाहतूक एकत्र येणार आहे. देशात हे पहिले असे मल्टीमॉडेल स्टेशन असणार आहे. यामुळे लोक मेट्रोने प्रवास करण्यासाठी नाही तर हे स्टेशन पाहण्यासाठी येतील, असा आराखडा या मेट्रो प्रकल्पाचा केला आहे. पुण्यातील विस्तारीत मेट्रो वाघोली, चांदणी चौक आणि इतर भागांत होत आहे. यामुळे भविष्यात पुण्यातील कोणत्याही टोकापासून कोणत्याही टोकापर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. पुणे शहर मेट्रोने इन्ट्रीग्रेट होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांनी विरोधकांना घेरले

पुणे मेट्रोवरुन आंदोलन करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी घेरले. ते म्हणाले, 26 तारखेला हा कार्यक्रम होणार होता. मात्र पाऊस झाला आणि पुणेकराना त्रास होऊ नये, म्हणून कार्यक्रम रद्द करण्यात आला. विरोधकांना काही कामे राहिली नाहीत, त्यामुळे ते काही बोलत सुटले आहेत. पुण्यातील ही मेट्रो अंडरग्राउंड व्हावी, असे अनिल शिरोळे यांना वाटत होते. मात्र खर्च जास्त होत होता. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार नाही, हे लक्षात घेऊन आणि पुढील 50 वर्षांचा विकास लक्षात घेऊन हा प्रकल्प उभा राहिला आहे.