पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधून राजस्थानात गेले. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. अन् ते कमकुवत झाले आहे. तसेच पुढच्या ६ तासात अजून कमकुवत होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील मान्सूनची प्रगती सध्या थांबली आहे. मान्सून रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. परंतु चांगली बातमी म्हणजे दक्षिण द्विपकल्पातील काही भागांमध्ये आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये १९-२२ जूनपर्यंत मान्सूनची प्रगती होणार आहे. मान्सून सध्या रत्नागिरीतच रुसून बसला आहे. यामुळे राज्यभरातील त्याचा पुढचा प्रवास थांबला आहे. शनिवारीसुद्धा मान्सूनची काही प्रगती झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रुके रुके से कदम रुक के …
No advancement of monsoon today. but as per IMD, conditions r becoming favorable for further advancement of SW Monsoon in some parts of S Peninsula & parts of east India by 19-22 June. pic.twitter.com/ewwiCKI4uy— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2023
अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाला आहे. नैऋत्य मान्सून भारतात ४ जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर देशभरात त्याची वाटचाल सुरु होते. परंतु नैऋत्य मान्सूनला पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असली तरी त्याला काही काळ लागणार आहे.
मान्सूनने दडी मारल्याने कोकणात शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोकणातील भात शेतीचा विचार करता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमीन नांगरून भात पेरणी केली जाते. भाताची रोपे साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात काढली जातात आणि त्याची लावणी केली जाते. हे चक्र व्यवस्थित रहाण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात तरव्याची पेरणी होणे गरजेचे असते. मात्र या वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. अनेक भागात विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत. काही वेळेला विहिरींचे पाणी वापरून सुध्दा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पेरण्या होतात. यावर्षी विहिरींना पाणी नसल्याने पेरणी झाली नाहीय.
17/6:बिपोरजाॅय चक्रिवादळ लगतच्या राजस्थान, गुजरात व पाकीस्तान भागात असून,सध्या कमकुवत झाले असून ते तीव्र कमी दाबाचे क्षेत्र.
पुढच्या ६ तासात अजून कमकुवत होण्याची शक्यता व पुढच्या १८ तासात खाली दर्शवल्याप्रमाणे प्रवास.
130km frm Dholavira,110km frm Barmer
या सर्व ठिकाणी इशारे कायम pic.twitter.com/IRW55ACEbW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2023
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी 80 ते 90 टक्के भात पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र 15 ते 20 टक्केच पेरण्या झालीय. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोकणातीलच नाही राज्यभरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.