पुणे, रायगड | 17 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील चांदणी चौक पुलाचे लोकर्पण नुकतेच झाले. त्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. तसेच पुणे, मुंबई हा मार्ग एक्सप्रेस वेवर असला तरी या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या काही सुटत नाही. शनिवार, रविवार आणि विकएँड आल्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागता. आता पुन्हा सलग सुट्यामुळे बाहेर पडलेल्या पुणे आणि मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.
पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी (Traffic Issue) होत असते. यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा या समस्येला सामोरे जावे लागले. जुलै महिन्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे तीन, चार वेळा वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी दरडचे काम करण्यासाठी मेगा ब्लॉग घेण्यात आला होता. त्यानंतर अपघातामुळे महामार्ग बंद झाला होता. बोरघाटात आणि टोल नाक्यावर ही समस्या नेहमी असते. आता रविवारी पुन्हा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका ते कुंभवलीपर्यंत 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. हलक्या आणि जड वाहनांच्या या रांगा लागल्या आहेत. आता गणेशोत्सव आणि विकेंडमुळे अनेक जण गावी निघाले आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकडून पुणे शहरात येणारे वाहनधारक ट्रॅफीक जाममध्ये अडकले आहेत. तसेच कोल्हापूर, कोकणात, मराठवाड्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक निघाले आहे. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीतून अडकण्यापेक्षा गुगल मॅपवरुन कोणत्या मार्गाने जाता येईल, याचा शोध वाहनधारक घेत आहेत. जुन्या मार्गाने जाण्यासाठी किती वेळ लागणार? हे पाहून काही जण द्रुतगती मार्गाऐवजी त्या रस्त्याने जात आहेत. भरभक्कम टोल देऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे वाहनधारक नाराज झाले आहेत. आता हा महामार्ग सहा ऐवजी आठ पदरी करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानंर वाहतूक कोंडी सुटणार का? हे भविष्यातच स्पष्ट होईल.