पुणे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या महामार्गावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. शनिवार, रविवार आणि सुट्यांच्या दिवशी तर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. हा महामार्ग देशातील टॉप 10 व्यस्त मार्गामध्ये गणला जातो. परंतु आता यावरील वाहतुकीची कोंडी संपणार आहे. या ठिकाणी करण्यात येत असलेली मिसिंग लिंक योजना पूर्णत्वाकडे येत आहे. तसेच या योजनेमुळे मुंबई पुण्यामधील आंतर आठ किलोमीटरने कमी होणार आहे.
काय आहे योजना
पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्याचा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम आता ७५ टक्के झाले आहे. तसेच पुढील वर्षी मार्चपर्यंत ते पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गवर वाहतुकीची कोंडी राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच या मार्गावरील अपघातही कमी होणार आहे. ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सर्वात व्यस्त मार्ग
देशातील सर्वात व्यस्त 10 मार्गांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस-वे चा समावेश करण्यात आला आहे. रेडबसने केलेल्या सर्वेक्षणात 2022 या वर्षाच्या तुलनेत वर्ष 2023 च्या वीकेंडमध्ये मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या आरक्षणामध्ये 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ह्या एक्सप्रेस हायवेची लांबी 94 किलोमीटर असून या महामार्गावरून रोज किमान 50 हजार वाहने धावतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी हा आकडा वाढून 70 ते 80 हजार इतका होतो.