अभिजित पोते, पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी आला. त्यानंतर महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात ११ जून रोजी आला. ४ जून ते ११ जून दरम्यान मान्सूनचा प्रवास बिपरजॉय चक्रीवादळाने रोखला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात १५ जून रोजी येणारा मान्सून चक्रीवादळामुळे उशीराने आला. राज्यात २५ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा हवामान विभागाने केली. आता गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनची दमदार वाटचाल पुणे, मुंबईत सुरु आहे. राज्यात पुढील पाच दिवस मान्सून कसा असणार याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे शहरात मंगळवारपासून पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे शहरात २ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे शहरात गेल्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता पुढील दोन दिवस संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भाच्या काही भागांसह अन्य काही भागात यलो अलर्ट दिला आहे.
27/6: #नवीमुंबई, #मुंबई & #ठाणे मध्ये आज सकाळपर्यंत गेल्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस.
?संपूर्ण #कोकणसह #मुंबई #ठाणे आणि मध्य #पुणे #नाशिक #सातारा ? ऑरेंज अलर्टवर 2 दिवस येत आहे, #विदर्भाच्या काही भागांसह. अन्य काही भागात?पिवळा अलर्ट.IMD अपडेट्स पहा☔ pic.twitter.com/O7R3tu2YmN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 27, 2023
पुणे शहरात दोन दिवसांत २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच जून महिन्यामध्ये एकूण ४५ मिमी पाऊस झाला आहे. यंदा जून महिन्यात गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी पाऊस असणार आहे.
पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेनेही तयार केली आहे. पूर परिस्थिती रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून स्वतंत्र पथके तयार केली आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके 24 तास सज्ज राहणार आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असते. त्याचा निचरा करण्यात येणार आहे. पुणेहीच पूर परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने तयार केली कर्मचाऱ्यांची पथके
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये सोमवारी दिवसभरात 3.3 मिमी पावसाची नोंद झाली.
शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता.