अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातून नाशिकला (Nashik- Pune) जाण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे या ठिकाणी सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) सुरु करण्याची घोषणा झाली आहे. मध्यंतरी महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) ने भूसंपादनाचे काम थांबवण्याचे पत्र दिले होते. नाशिक जिल्हाधिकारींना निधी नसल्यामुळे हे काम थांबण्यात आदेश दिले होते. त्यानंतर शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या अन् महारेलने ते पत्र मागे घेतले. परंतु या मार्गासाठी पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.
पुणे नाशिक रेल्वे अद्याप कागदावरच
फेब्रुवारी महिन्यात पुणे- नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेला सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली होती. परंतु पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. यामुळे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 16 हजार 39 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. ज्या प्रमाणे गेले काही दशकांपासून मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची चर्चा सुरु आहे, त्याचप्रमाणे पुणे-नाशिक प्रकल्पाची फक्त चर्चाच राहणार आहे, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.
फडणवीस यांची मध्यस्थी
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वे मंत्रालयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वे मार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या. परंतु अजूनही रेल्वेची तांत्रिक मंजुरी मिळाली नाही.
काय आहे वैशिष्ट्ये