मोठी राजकीय बातमी | अजित पवार पुन्हा ‘नॉट रीचेबल’, काय सुरु आहे चर्चा

| Updated on: Apr 08, 2023 | 9:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या कुणाच्याही संपर्कात नाही. ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सोशल मीडिया आणि मोबाइलवर मेसेज फिरत आहे. राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार का? ही चर्चा सुरु आहे.

मोठी राजकीय बातमी | अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल, काय सुरु आहे चर्चा
Image Credit source: tv9
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. अजित पवार यांचे पुण्यातील दोन दिवसांचे कार्यक्रम केले रद्द केले आहेत. दरम्यान, या संदर्भात सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटनंतर राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व कार्यक्रम रद्द


विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रीचेबल झाले आहेत. अजित पवार यांनी पुण्यातील दोन दिवसांचे कार्यक्रम केले रद्द केले आहेत. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात अजित पवार यांचे विविध कार्यक्रम होते. ते शनिवारी एका इफ्तार पार्टीत जाणार होते. परंतु ते शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना सांगत दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. हे कार्यक्रम रद्द का झाले? याचे कारण समजू शकले नाही.

काय सुरु आहे चर्चा


अजित पवार नॉट रीचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. शिवाय सोशल मीडियातही अजित पवारांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट राजकारणावर आहे. या ट्विटमध्ये पाहटेच्या शपथविधीचा फोटो ट्विट केला आहे. “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिले आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर मविआची स्थापना झाली. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी झाल्या होत्या. अजित पवार यांनी थेट भाजपची हातमिळवणी केले होती. सध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

सोशल मीडियावर चर्चा


अजित पवार नॉट रिचेबल झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी पहाटेच्या शपथविधीचा फोटो वापरत अजित दादा गेले कुठे म्हटले आहे. अनेकांनी अजित पवार यांच्यासोबत काही आमदार गेल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी शुक्रवारी गौतम अदानी विषयावर मोदी सरकारची पाठराखन केली होती. त्या विषयाशी अजित पवारांचा विषय अनेकांनी जोडला आहे. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पुन्हा बदलणार का? याची जोरदार चर्चा सुरु आहे.