पुणे : पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. यातील अनेक अपघात चालकांच्या चुकीमुळे होत आहेत. वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. शनिवारी रात्री खाजगी ट्रॅव्हलचा अपघात झाला. या अपघातात वाहतूक नियमांचे पालन केले गेले नसल्याचे स्पष्ट झाले. चालक सिगारेट पीत होता, त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मग गाडी पुलावरुन खाली कोसळली. गाडीतील प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी चालकाच्या चुकीमुळेच अपघात झाल्याचा आरोप केला आहेत.
पुण्यातील बावधन जवळभीषण अपघात
पुण्यातील बावधन येथे ट्रॅव्हल बस पुलावरून रस्त्यावर कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अपघातात गरोदर महिला आणि तिचे लहान बाळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीत एकूण ३६ प्रवासी असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले.
चालक सिगारेट पीत असल्याने त्याच्या गाडीवरची नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. आता या प्रकरणात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
देशभरात अपघात का वाढले
देशभरात 2022 मध्ये 3,68,828 इतकी रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद झाली होती. हे प्रमाण वर्षभरात कैक पटीने वाढले आणि वाहतूक अपघातांचा आकडा थेट 2021 मध्ये 4,22,659 पर्यंत वाढला आहे. या वाहतूक अपघातांमध्ये 4,03,116 रस्ते अपघात, 17,993 रेल्वे अपघात आणि 1,550 रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश आहे. त्यात अनुक्रमे 1,55,622 मृत्यू, 16,431 मृत्यू आणि 1,807 मृत्यू अशी मनुष्यहानी झाल्याचे एनसीआरबीने म्हटले आहे.
काय आहेत अपघातांची कारणे
भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवणं, टायर फुटणं, लेन कटिंग, ओव्हरटेंगिक यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या अपघाताच्या वेळा पाहिल्यास, सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.