काँग्रेसमध्ये मोठं काहीतरी घडतंय? विदर्भाचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून, नाना पटोलेंचा प्लॅन काय?

| Updated on: May 09, 2024 | 1:01 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत काही प्रादेशिक पक्ष काँग्रससोबत जाण्याचा किंवा काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा विचार करु शकतात, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार असं वक्तव्य करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेलमधील अंतर्गट गटबाजी लक्षात आल्यानंतर नाना पटोले यांनी आपली विदर्भातील तब्बल 10 आमदारांची फौजच पुण्यात उतरवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुण्यात राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग येणार आहे.

काँग्रेसमध्ये मोठं काहीतरी घडतंय? विदर्भाचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून, नाना पटोलेंचा प्लॅन काय?
राहुल गांधी आणि नाना पटोले
Follow us on

पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे ला मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सुटली आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र धंगेकर निवडून यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे रविंद्र धंगेकर यांचं काम करत असताना नाना पटोले यांना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याची चर्चा आहे. यामुळेच नाना पटोले यांनी आपली स्वत:ची एक टीमच पुण्यात उतरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले यांनी विदर्भातील काँग्रेसच्या तब्बल 10 आमदारांना पुण्यात आणलं आहे. हे सर्व आमदार पुण्यात सलग 5 दिवस तळ ठोकून असणार आहेत. हे सर्व आमदार थेट पक्षाला रिपोर्ट देणार आहेत.

रविंद्र धंगेकर यांच्यासाठी स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लक्ष ठेवून आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणी, प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी याचं नियोजन नाना पटोले यांनी हातात घेतलेलं आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी विदर्भातील आमदारांना पुण्यात आणलं आहे. काँग्रेसमध्ये देखील एक अंतर्गत गटबाजी दिसत आहे. त्याचा फटका बसू नये, स्वत:ची एक टीम असावी यासाठी नाना पटोले यांनी लक्ष घातलेलं आहे.

विदर्भातील ‘हे’ आमदार पुण्यात

विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत. हे सर्व 10 आमदार पक्षाला रिपोर्ट सादर करणार आहेत. काँग्रेस आमदारांची टीम पुण्यात दाखल होत आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी विदर्भातील काँग्रेसची टीम सज्ज होणार आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाना पटोले यांनी स्वतःची टीम मैदानात उतरवली आहे. या आमदारांमध्ये यशोमती ठाकूर, सुनील केदार, धीरज लिंगडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, अमित झनक, राजू आवळे, नाना पटोले यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार दररोज पक्षाला रिपोर्ट देणार आहेत. हे सगळे आमदार ५ दिवस पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत.

काँग्रेसला चांगले दिवस येणार?

रविंद्र धंगेकर हे गेल्यावर्षी पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्षाने त्यांना थेट पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. इथे त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत होत आहे. या निवडणुकीत कुणाचा विजय होईल ते 4 जूनला स्पष्ट होईलच. पण शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेलं वक्तव्य खरं ठरलं तर काँग्रेस पक्षाला आगामी काळात चांगले दिवस येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.