पुणे शहरात मेट्रो सुरु होण्यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची सेवा होती. शहरात अनेक मार्गांवर ही सेवा दिली जात होती. परंतु शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत काही ठिकाणी पीएमपीएमएल बसेस जात नव्हता. आता मेट्रो सेवेला जोडून काही मार्गांचा विस्तार पीएमपीएमएलकडून करण्यात आला आहे. एकूण सहा मार्गांचा विस्तार केल्यामुळे पुणे शहरातील नागरिकांची सुविधा होणार आहे.
PMPL बसच्या एकूण सहा मार्गांचा होणार विस्तार करणार आहे. शहरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता PMPL प्रशासनाचा हा निर्णय घेतला आहे.
पीएमपीएमएलकडून मोफत पास योजनाही सुरु केली आहे. पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार आहे. यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास दिली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना 75 टक्के सबसिडीत पास दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.
दोन पीएमपी बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात घडली. कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर (वय ४२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुजर हे कंत्राटी कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते.