Pune Accident | वाचवा, वाचवा…आवाज आला अन् धावलो… कृष्णा जाधव याने सांगितली ‘आँखों देखी’

| Updated on: Oct 22, 2023 | 1:51 PM

Pune Accident | पुणे शहरात संतोष माने अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. संतोष माने अपघाताची पुनरावृत्ती असलेला अपघात झाला. सुदैवाने कृष्णा जाधव या तरुणाने त्या चालकाला वेळीच रोखले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Pune Accident | वाचवा, वाचवा...आवाज आला अन् धावलो... कृष्णा जाधव याने सांगितली आँखों देखी
krushna jadhav
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

अभिजित पोते, पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात पुन्हा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती करणारा अपघात झाला. पुणे येथील सेनापती बापट रोडजवळ असणाऱ्या वेताळबाबा चौकात हा प्रकार घडला. पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले. त्या चालकाने दारूच्या नशेत पीएमटी बस चक्क उलटी चालवत नेली. निलेश सावंत या चालकाने शनिवारी दुपारी हा प्रकार केला. आता त्या चालकावर पीएमटी प्रशासनाने कारवाई केली आहे. त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे. हा सर्व प्रकार स्वत: कृष्णा जाधव यांनी पाहिला. त्यांनी धाडसाने बसमध्ये चढून त्या चालकाला रोखले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

बसमधील प्रवाशी ओरडत होते, वाचवा…वाचवा

टीव्ही ९ मराठीशी बोलताना कृष्णा जाधव यांनी बस चालकाने केलेल्या प्रकाराचा थरार सांगितला. त्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारीची एक ते दोन दरम्यानची वेळ होती. मी वेताळबाबा चौकात होता. त्यावेळी अचानक गोंधळ सुरु झाला. पीएमटीची बस उलटी चालली होती. बसमधील प्रवाशी वाचवा, वाचवा आवाज देत होते. काहीतरी अघटीत घडल्याचे मला समजले. यामुळे मी धाडसाने बसमध्ये चढलो. बसमध्ये महिलांसह जवळपास ८० ते ९० प्रवाशी होते.

काच फोडली अन् चालकाला रोखले

बसमधील चढल्यावर काच फोडून चालकाच्या कॅबिनमध्ये घुसलो. त्यावेळी चालक असलेला निलेश सावंत मी बदली ड्रायव्हर आहे, असे म्हणत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या तोंडातून मद्याचा वास येत होतो. त्याने मला शिवीगाळही केली. त्याला रोखल्यावर चतश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.

कृष्णा जाधव यांचा सत्कार

गाडी पुढे गेली असती तर चतश्रृंगी देवीचा उत्सवासाठी मोठी गर्दी झाली होती. बस त्या ठिकाणी पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु कृष्णा जाधव यांनी धाडस केले. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे आम्ही ठरवले, असे गोखले नगरमधील रहिवाशींनी सांगितले. दरम्यान, निलेश सावंत या चालकावर आता पीएमपीएमएलने कारवाई केली आहे. त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.