थायलंडमधून आलेल्या युवतीने उघडले मसाज पार्लर, पुण्यात सुरु केला ‘हा’ उपचार?

| Updated on: Feb 28, 2023 | 3:10 PM

पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कमध्ये मारलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका केली होती. त्यातील एक महिला थायलंडमधून टुरुस्टी व व्हिसा काढून आली.

थायलंडमधून आलेल्या युवतीने उघडले मसाज पार्लर, पुण्यात सुरु केला हा उपचार?
थायलंड मसाज
Follow us on

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) भांडाफोड पोलिसांनी केला होता. या ठिकाणी थायलंडमधून आलेल्या महिलेने मसाज पॉर्लरच्या नावाखाली व्यवसाय सुरु केला होता.

पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कमध्ये मारलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका केली होती. त्यातील एक महिला थायलंडमधून टुरुस्टी व व्हिसा काढून आली. पुण्यात कोरेगाव पार्कसारख्या भागात बस्तान मांडला. मग तिने मसाज पॉर्लरचा बोर्ड लावून थाई मसाज सुरु केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला. त्यावेळी ती व्हिसा संपलेल्या असताना थांबली असल्याचे स्पष्ट झाले. भारत आणि थायलंडमध्ये असलेल्या करारामुळे तिला अटक करण्यात आली नाही. परंतु तिला कायमचे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले. तिला पुन्हा थायलंडमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तिला थायलंडला पाठवण्यात येणार आहे.

कुठे सुरु केला होता उद्योग


पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. त्यांना तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. त्यापैकी एक महिला थायलंडमधील होती.

काय असतो स्पा सेंटर

पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटरचा फंडा गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. भारतातील अनेक लहान, मोठ्या शहरांमध्ये स्पा सेंटरचे बोर्ड लावलेले दिसतात. या ठिकाणी मसाज केली जाते. स्वीडिश, डिप टिश्यू व ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे अनेक पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून काही ठिकाणी वेश्याव्यवसाय केला जातो.

शहरात अनेक ठिकाणी सेंटर

शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.