एकीकडे पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरुच, दुसरीकडे पोलिसांनी केली मोठी कारवाई

| Updated on: Jun 29, 2023 | 3:30 PM

Pune Crime News : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांकडून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांनी या टोळक्यांवर मोठी कारवाई केली. एकाच दिवसांत घडलेल्या या प्रकारामुळे एकीकडे दिलासा मिळाला तर दुसरीकडे दहशत निर्माण झालीय.

एकीकडे पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरुच, दुसरीकडे पोलिसांनी केली मोठी कारवाई
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांशी अश्लील वर्तन करणारा अटक
Follow us on

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यांनी सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्याची ओळख बदलण्याचे काम सुरु केले आहे. त्याचवेळी कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्यामुळे विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. यासंदर्भात बॅनरबाजी करुन सरकारवर टीका केली जात आहे. मागील अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचवेळी एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहे. एकीकडे पोलिसांनी ३१ जणांना अटक केली आहे तर दुसरीकडे पुन्हा गाड्यांची तोडफोड केलीय.

पिंपरी चिंचवडमध्ये काय घडले

पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील चिखली घरकूल परिसर आणि शरद नगरमध्ये अज्ञात दोन व्यक्तींनी हातात कोयता नाचवत सात ते आठ वाहनांची तोडफाड केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालाय. गुन्हेगारांनी दहशत पासरवण्यासाठीच वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलेय. पोलिस किती ही दावा करत असले तरी वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यात त्यांना अपयश येत आहे.

सहकारनगरमध्ये केली कारवाई

पुणे शहरातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या अरण्येश्वर भागात नुकतेच अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी घरांवरही दगडफेक करुन दहशत निर्माण करण्यात आली. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच वारंवार हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यानंतरही पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ३१ जणांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळ्या वाढल्या आहेत. या टोळीपैकी एकाने काही दिवसांपूर्वी सहकारनगरमधील भर चौकात गाडी आडवी लावत तलवारीने केक कापत “भाईचा” वाढदिवस साजरा झाला. या भागात दहशत निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्यांवर कारवाई झाली आहे.