महामार्गावर उभा राहिला अन् वाहन धारकांकडून सुरु केली वसुली, मग काय झाले वाचा

| Updated on: Jul 06, 2023 | 4:01 PM

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून तोतया अधिकारी निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहे. आता फसवणुकीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे अनेक वाहन धारकांची फसवणूक झाली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महामार्गावर उभा राहिला अन् वाहन धारकांकडून सुरु केली वसुली, मग काय झाले वाचा
Image Credit source: Social Media
Follow us on

पुणे : कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर एक नवीन प्रकार समोर आला आहे. एका महाठगने रस्त्यावर उभा राहून वसुली सुरु केली. महामार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांकडून तो पैसे वसूल करु लागला. वाहन धारकसुद्धा अधिकारी समजून त्यास पैसे देत होते. परंतु कधीतरी अपराध पूर्ण होतात. त्यानुसार तो ही पोलिसांच्या जाळ्यात आला. आता या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट वनअधिकारी

वन अधिकारी असल्याची बतावणी करून राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ हा अनेक वाहनधारकाची फसवणूक करत होता. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून तो पैशांची मागणी करत होता. एखाद्याकडे रोकड रक्कम नसली तर ‘फोन पे’ सुद्धा तो पैसे घेत होता. अगदी ३० हजारपर्यंत रक्कम वाहनधारकाकडून तो वसूल करत होता. त्याच्या या प्रकाराची माहिती ओतूर वन विभाग कार्यालयात गेली. वनविभागाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती कळवली.

काय म्हणतातआरएफओ

आरएफओ वैभव काकडे यांनी सांगितले की, आम्हाला राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ संदर्भात तक्रार प्राप्त झाली. तो २८ आणि २९ जून रोजी नगर कल्याण महामार्गावर थांबला होता. त्यावेळी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकाकडून पैशांची मागणी करत होता. पैसे न देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत होता.

हे सुद्धा वाचा

अगदी ३० हजार रुपयांपर्यंत रक्कम तो घेत होता. तो तोतया वन अधिकारी असल्याचे आम्हाला लक्षात आले. त्याची तक्रार ओतूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी त्याला दिली.