Pune Koyta Gang : कोयता गँगचा पोलिसांनी केला गौप्यस्फोट

| Updated on: Jan 17, 2023 | 5:00 PM

पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली

Pune Koyta Gang : कोयता गँगचा पोलिसांनी केला गौप्यस्फोट
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत
Image Credit source: Google
Follow us on

पुणे: Pune Crime: पुणे शहरात धुमाकुळ माजवणाऱ्या ‘कोयता गँग’चा (Pune Koyta Gang)पोलिसांनी गौप्यस्फोट केलाय. शहरात व उपनगरात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्यांचा मुसक्या आवळल्या आहेत. कोयत्या गँगमुळे हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोयता गँग पुण्यातील मुख्य भागात चांगलीच सक्रीय होती. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील कोयते उगारुन दहशत माजवणाऱ्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या या टोळीकडून पोलिसांना इतर महत्वाची माहिती मिळणार आहे.

पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली. कोयत्या गँगमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्लॅन तयार केला.

हे सुद्धा वाचा

जंगली महाराज रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या गँगला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीकडून चार कोयते आणि दुचाकी गाड्या जप्त केल्या. अटक केलेल्यांमध्ये रणजीत रघुनाथ रामगुडे, रोहन गोरख सरक, विशाल शंकर सिंह, आदित्य राजेश वडसकर यांचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.