कोरेगाव भीमाला जाणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, पुणे पोलिसांकडून यावर्षी विशेष सुविधा

| Updated on: Dec 29, 2023 | 9:52 PM

पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांना जयस्तंभापर्यंत जाण्याचा मार्ग, वाहनांचे पार्किंगची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कोरेगाव भीमाला जाणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, पुणे पोलिसांकडून यावर्षी विशेष सुविधा
Follow us on

पुणे | 29 डिसेंबर 2023 : पुणे पोलिसांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनासाठी ‘जयस्तंभ गाईड 2024’ नावाने नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पेरणे येथे पोहोचण्यासाठी लागणारे सर्व मार्ग, पार्किंगची व्यवस्था, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग यांसह पीएमपीएल बसेस आणि वैद्यकीय सेवा देखील मिळणार आहे. नव्या लिंक वरती क्लिक करून या सर्व सुविधा अनुयायांना एका क्लिकवर मिळवता येणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून जयस्तंभ गाईड 2024 या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली आहे.

पुणे पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय?

पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांना जयस्तंभापर्यंत जाण्याचा मार्ग, वाहनांचे पार्किंगची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जयस्तंभ गाईड २०२४ चे लिंकचे अनावरण पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे विभागाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पुणे शहराचे उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त ए राजा आणि पुणे शहर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेल्या जयस्तंभ गार्डड I- २०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ रोजी कोरेगाव भिमा, पेरणे येथे जयस्तंभास अभिवादन करण्याकरीता शहरातून तसेच राज्यातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांकरीता तसेच या परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकरीता बंद रस्ते, पर्यायी मार्ग, पार्कंग, पी.एम.पी.एम.एल. बस स्टॉप, वैद्यकीय मदत, अनुयांयाकरीता उपलब्ध मार्ग, इत्यादींबाबत सविस्तर माहिती सोबत दिलेल्या लिंक आणि क्युआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अधिकाधिक नागरिकांची गैरसोय टाळावी या उद्देशाने ‘जयस्तंभ’ गाईड-२०२४ ची निर्मिती केली आहे.

‘जयस्तंभ’ गाईड- २०२४ चे वैशिष्ट्ये

• या गाईडचे माध्यमातून जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणारे वाहनचालकांसाठी मार्ग व पार्किंग ठिकाणे यांची माहिती देण्यात आली आहे.

• या गाईडमध्ये अनुयायांच्या वाहनांकरीता असलेले मार्ग, पार्किंगची ठिकाणे, पी.एम.पी.एम.एल.चे बसस्टॉप, कोरेगाव भिमा, पेरणे परिसरातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचेही मार्गदर्शन लाभेल.

• सदर भागातील अवजड वाहतूकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती मिळू शकेल.

• नागरिक व वाहनचालक यांची गैरसोय टाळावी याकरिता ‘जयस्तंभ’ गाईड- २०२४ लिंक व क्यू आर कोडची प्रसिध्दी सोशल मिडीया, वृत्तपत्र, सर्व वाहनतळ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, खाजगी ट्रॅव्हल्स थांबे, शहरातील सर्व उपलब्ध एल.ई.डी. स्क्रिनवर, या ठिकाणी बॅनर स्वरुपात लिंकची माहिती उपलब्ध केली जाईल.

‘जयस्तंभ’ गाईड- २०२४ :-

  • क्यू. आर. कोड अथवा लिंक ओपन केल्यानंतर View map legend या option मध्ये मॅपवर सदर भागातील पार्किंग ठिकाणे, बंद रस्ते, जड वाहतूकीस बंद रस्ते, पर्यायी रस्ते याची माहिती देण्यात आलेली आहे.
  • मॅपवर दिलेल्या वाहनतळ / पार्कींग आयकॉनवर क्लिक केलेनंतर नागरिकांना इच्छितस्थळी
  • जाणेकरीता उपलब्ध असलेल्या मार्गाची माहिती मिळू शकेल.
  • त्याचप्रमाणे नागरिकांना त्यांचे लोकेशनपासून वाहनतळाचे ठिकाणी पोहचणे करिता डायरेक्शनव्दारे मार्ग पाहता येणार आहे.
  • सदर मार्गांदरम्यान बंद असलेले रस्ते जागीच समजतील.
  • नागरिकांनी आपले वाहन पार्क केलेल्या पार्किंग ठिकाणाचा क्रमांक लक्षात ठेवून त्याप्रमाणे पार्किंग जवळील बसस्टॉप पासून गोल्डन पॅलेस या जयस्तंभाजवळील बसस्टॉप पर्यंत पी.एम.पी.एम.एल. बस सेवा पुरविण्यात येणार असल्याने वाहन पार्क केलेल्या पार्किंग ठिकाणाच्या क्रमांकाप्रमाणे बसेसचा उपयोग करावा.
  • तरी सर्व सोशल मिडीया व वृत्तपत्र संस्था यांना आवाहन करण्यात येते की, जयस्तंभ अभिवादन कालावधीत नागरिकांकरीता सुविधा निर्माण व्हावी याकरीता ‘जयस्तंभ’ गाईड २०२४ ही लिंक व क्यू. आर. कोड प्रसारीत करण्यात यावे.