Pune News : पाच कोटींची तस्करी, पुणे शहरात काय आणले होते आरोपींनी विकण्यासाठी?

| Updated on: Sep 04, 2023 | 9:07 AM

Pune News : पुणे शहरात तस्करीचे प्रकार वाढत आहेत. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करांना पकडले आहे. त्यांच्याकडून पाच कोटी रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तस्कारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pune News : पाच कोटींची तस्करी, पुणे शहरात काय आणले होते आरोपींनी विकण्यासाठी?
Follow us on

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात तस्करीचे प्रमाण वाढले आहे. कधी अंमलीपदार्थांची तस्करी होते तर कधी बंदी असलेल्या गोष्टींची तस्कारी केली जाते. आता बंदी असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या आरोपीला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केले आहे. विश्वनाथ रतन गायकवाड (38, रा. कात्रज खोपडेनगर, गुजरवाडी) या आरोपीकडून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये देखील डेक्कन पोलिसांनी पाच कोटींची व्हेल माशांची उलटी जप्त केली होती. त्यावेळी पाच तस्करांना अटक केली होती. पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक हॉटेलच्या मागे आरोपीला पकडले.

पुण्येश्वर मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटना आणि पुण्येश्वर मंदिर पुनर्निर्माण समितीकडून यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली. या विषयाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला होता.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरवला बाल मित्रांचा हट्ट

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवासादरम्यान काही बाल मित्रांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही जणांना स्वाक्षरी दिली. त्यासोबत त्यांनी एक संदेश लिहून दिला. त्यात लिहिले की, “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची एक तरी कथा रोज झोपण्यापूर्वी वाचा. त्यानंतरच आपली दिनचर्या पूर्ण करा.”

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांना दाखवला सुभेदार चित्रपट

पुणे जिल्ह्यातील भोरमधील भोलावडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या 100 विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला. भोलावडे सरपंच ग्रुपतर्फे सुभेदार हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट त्यांना दाखवला. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी हा चित्रपट दाखवला. हा चित्रपट नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याच्या कथेवर आहे.

आज खेड तालुका बंद

मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. खेड तालुक्यातील व्यापारी असोसिएशन, वकील आणि विविध संघटनांचा या बंदला पाठिंबा दिला आहे. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे.