शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट?; प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, मोदी बागेत…

| Updated on: Dec 31, 2023 | 9:08 AM

Prakash Ambedkar and Sharad Pawar Meeting in Pune? : शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याची चर्चा होतेय. या भेटीच्या चर्चांन; प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, मोदी बागेत...

शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट?; प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, मोदी बागेत...
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 31 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच पुण्यात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील मोदीबाग या भागात शरद पवार यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यासोबत भेट झाली नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पवार-आंबेडकर यांच्यात भेट?

पुण्यात शरद पवार राहत असलेल्या मोदी बागेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि पवार यांच्या भेटीवरून तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आंबेडकरांकडून मात्र पवारांची भेट झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शरद पवार राहत असलेल्या मोदी मोदी बागेमध्ये माझे नातेवाईक राहतात. माझ्या दोन बहिणी या ठिकाणी राहतात. त्यांना भेटण्यासाठी मी मोदी बागेमध्ये आलो होतो. शरद पवार यांच्यासोबत माझी भेट झालेली नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीची चर्चा होत आहे. ही भेट झाल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर प्रकाश आंबेडकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण मोदी बागेत गेलो होतो. मात्र तिथं जाण्याचं कारण शरद पवारांची भेट नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले…

शरद पवार राहत असलेल्या मोदी मोदी बाग या ठिकाणी माझे नातेवाईक राहतात. माझ्या दोन बहिणी या ठिकाणी राहतात. त्यांना भेटण्यासाठी मी मोदी बागेमध्ये गेलो होतो. मोदी बागेमध्ये माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मी नेहमी जात येत असतो. मोदी बागेमध्ये मी नातेवाईकांनाच भेटायला गेलो होतो. शरद पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही. किंवा त्यांना भेटायला मी तिथे गेलो नव्हतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.