Pune News | पुणे बदलतेय, महाग घरांची मागणी वाढली, वाचा कशी वाढत गेली मागणी

| Updated on: Sep 17, 2023 | 10:42 AM

Pune Property registrations | पुणे शहरातील लोकांचा कल आता महागड्या घरांच्या खरेदीकडे वाढू लागला आहे. आता पुणे शहरात महाग घरांची विक्री वाढली आहे. त्याचवेळी ऑगस्ट महिन्यात मागील वर्षापेक्षा दुप्पट घरांची विक्री झाली आहे.

Pune News | पुणे बदलतेय, महाग घरांची मागणी वाढली, वाचा कशी वाढत गेली मागणी
Follow us on

पुणे | 17 सप्टेंबर 2023 : सर्वसामान्य व्यक्तीचे आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असते. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमा करतो आणि हक्काचे घर घेतो. परंतु आता नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे. पुणे शहरात आलेले उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमुळे पुणेकरांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे पुणेकरांची पसंती बदलत आहे. आता अलिशान घरे घेण्याकडे पुणेकरांचा कल वाढत आहे. नाईट फ्रॉन्कच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

घरांची विक्री झाली दुप्पट

पुणे शहरात घरांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 13,021 घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत 6,544 घरांची विक्री झाली होती. घरांची विक्री वाढत असताना स्टॅप ड्यूटी कलेक्शन वाढले आहे. घरांच्या विक्रीतून मिळणार महसूल तब्बल 82 टक्के वाढला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत 423 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या काळात संपूर्ण राज्याचा स्टँप ड्यूटीच्या माध्यमातून मिळणार महसूल 3,226 कोटी रुपये आहे.

महाग घरांची विक्री वाढली

पुणे शहरात महाग घरांची विक्री वाढली आहे. 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांना मागणी आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या 130 घरांची नोंदणी झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या किंमतीची 65 घरे विकली गेली होती. तसेच 25-50 लाख किंमत असलेल्या घरांची विक्री 34 टक्के वाढली आहे. 50 लाख ते 1 कोटी किंमत असलेल्या घरांची विक्री 32 टक्के वाढल्याचे नाईट फ्रॉन्कच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे पुणेकरांना आता महाग घरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

पुणेकरांना कशी घरे हवीत

500 ते 800 स्केअर फुटांच्या घरांची मागणी वाढली आहे. या महिन्यात नोंदवलेल्या एकूण मालमत्ता व्यवहारांपैकी सत्तेचाळीस टक्के व्यवहार या श्रेणीत मालमत्तेचा होता. तसेच 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये ऑगस्ट 2023 मध्ये एकूण व्यवहारांपैकी 25 टक्के व्यवहार होते. पुणे शहरात घरे घेणाऱ्यांमध्ये 30 ते 45 या वयोगटातील लोक सर्वाधिक आहेत.