Pune News | पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार, कुठे सुरु झाले नवीन सॅटेलाईट टर्मिनलचे काम

| Updated on: Sep 19, 2023 | 11:33 AM

Pune satellite terminal | पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. पुण्यात देशभरातून लोक आले आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढत आहे. परंतु पुणे स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे सुरु करण्यास मर्यादा येत आहे. आता नवीन टर्मिनल उभारले जात आहे.

Pune News | पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार, कुठे सुरु झाले नवीन सॅटेलाईट टर्मिनलचे काम
pune junction railway station
Image Credit source: Social Media
Follow us on

पुणे | 19 सप्टेंबर 2023 : पुणे शहर शैक्षणिक आणि उद्योगाचे केंद्र आहे. यामुळे देशभरातून अनेक जण शिक्षण आणि रोजगारासाठी येत आहे. यामुळे पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. देशभरातून येणाऱ्या लोकांसाठी रेल्वे हे महत्वाचे साधन आहे. यामुळे पुणे शहरातून देशभरात रेल्वेची व्यवस्था केली जात आहे. परंतु पुणे रेल्वे स्थानकावर सहाच फ्लॅटफॉर्म आहेत. यामुळे नवीन रेल्वे सुरु करण्यास मर्यादा येतात. आता पुणे रेल्वे स्थानकाचे सॅटेलाईट टर्मिनल सुरु करण्यात येत आहे. त्याचा फायदा नवीन रेल्वे सुरु करण्यास होणार आहे.

मुंबईचा फंडा आता पुणे शहरात

मुंबई शहरात रेल्वे स्थानकांचा विस्तार विविध ठिकाणी केला गेला. यामुळे विविध ठिकाणी टर्मिनल सुरु करुन मुंबईवरुन विविध ठिकाणी रेल्वे सोडण्यात आल्या. आता पुणे शहरात हाच प्रकार करण्यात येणार आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करुन नवीन टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील हडपसरमध्ये नवीन टर्मिनल उभारण्याचे काम सुरु आहे.

किती खर्च येणार नवीन टर्मिनलसाठी

हडपसर येथे सुरु करण्यात येणाऱ्या नवीन टर्मिनलसाठी 135 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन्ही मार्गांच्या प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटर असणार आहे. यामुळे या ठिकाणी 24 गाड्यांची रेल्वे थांबू शकतात. तसेच नवीन इमारतीची उभारणी केली जात आहे. याठिकाणी पार्किंगची सुविधाही केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

या सुविधा होणार तयार

हडपसर रेल्वे टर्मिनलवर वेटींग रुम, बुकींग ऑफीस, चौकशी कक्ष, प्लॅटफॉर्मवर 800 मीटरचा शेड, प्रवाशांसाठी रिटेरिंग रुम, टीटीई ऑफिस आणि रेस्ट रुम, क्लॉक रुम, पार्सल ऑफिस, लगेच ऑफीस, आरपीएफ ऑफीस, जीआरपी ऑफीस या ठिकाणी सुरु होणार आहे. येत्या वर्षभरात या टर्मिनलची सर्व कामे पूर्ण होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर कामे सुरु

हडपसर येथे नवीन टर्मिनल उभारत असताना पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील क्रमांक दोन, तीन आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच२६ डब्यांच्या गाड्या थांबू शकतील.