अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार सुरु आहेत. नुकतेच आयटी कंपन्यांमधील तरुणांना कर्ज टॉपअप करणाऱ्याच्या नावाने फसवले गेले होते. तब्बल २०० तरुणांची या पद्धतीने फसवणूक करण्यात आली होती. २०० जणांची ३०० कोटी रुपयांमध्ये ही फसवणूक झाली होती. त्यानंतर बिटस कॉइन आणि ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत चांगल्या नफाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पुन्हा पुणे शहरातील शेकडो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १६ कोटींमध्ये ही फसवणूक झाली आहे.
कशी केली फसवणूक
पुणे शहरात राहणाऱ्या अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. पैसे गुंतवा यावर चांगले पैसे परत मिळतील असे आमिष दाखवून शेकडो लोकांना त्यांनी गंडा घातला आहे. APS वेल्थ वेंचरचे संचालक अविनाश राठोड आणि त्यांची पत्नी विशाखा यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
कधीपासून सुरु होता प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१८ पासून सुरू होता. या प्रकरणात अविनाश राठोड आणि त्यांच्या पत्नी विशाखा राठोड यांनी ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून लोकांना गुंवतणूक योजनेत रक्कम गुंतवणूक करण्यास लावत होते. त्यांनी शेकडो लोकांकडून १ कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र परताव्याची मागणी केली तेव्हा त्यांना काहीच मिळाले नाही. या प्रकारे या दोघांनी मिळून शेकडो लोकांना तब्बल १६ कोटी रुपयांचा गंडा घातला. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता दोघांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमिषाला बळू पडू नका
लोकांनी कोणत्याही गुंतवणूक योजनेच्या आमिषाला बळू पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केली आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना तिला शासनाची मान्यता आहे का? याचा विचार करुन गुंतवणूक करावी. कोणत्याही योजनेत चार ते पाच वर्षांत तुमची दुप्पट रक्कम होत नाही. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूंनी शहनिशा करुनच गुं
पुणे शहरातील डॉक्टरासह नऊ जणांची कोट्यवधीत फसवणूक? काय केले नेमके आरोपीने?
पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक