अभिजित पोते, पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखा विभागाने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थ जप्त केले होते. सुमारे दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे म्हणजे MD ड्रग्स होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांना तुरी देऊन ललित पाटील फरार झाला. आता या प्रकरणात पोलिसांना यश आले आहे.
ड्रग्स तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील आणि भूषण पाटील याच्या मागावर होते. साकीनाका पोलिसांनी ३०० कोटींचे ड्रग्स केले होते. त्या प्रकरणात हे आरोपी होते. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते. आता उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून भूषण पाटील याला अटक केली आहे. भूषण पाटील हा ड्रग्स माफिया ललित पाटील याचा भाऊ आहे. भूषण पाटील याचा ड्रग्स बनवण्याचा कारखाना होता.
ड्रग माफिया ललित पाटील पुणे ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर त्याचे नाशिक कनेक्शन उघड झाले. नाशिकमध्ये ललित पाटील याच्या भाऊ भूषण पाटील याने ड्रग्सच्या कारखाना उभा केला होता. त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी नुकताच छापा मारला. परंतु नाशिकमधील हा प्रकार नाशिक पोलिसांना माहीत नव्हता, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक रोडवरील शिंदे एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी सहा ऑक्टोंबर रोजी छापा टाकला होता. त्यात सुमारे 300 कोटींचे 150 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. यावेळी मुंबईसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून 12 जणांची धरपकड पोलिसांनी केली. परंतु ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील फरार झाला. अखेर त्याला लखनऊमध्ये अटक करण्यात आली.