बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी विजय शिवतारे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी ही बैठक बोलावली होती. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासह सरपंच आणि उपसरपंच देखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर शिवतारे यांनी जहरी टीका केली. पवारांनी दहशतवाद निर्माण केला, असा जोरदार शाब्दिक हल्ला विजय शिवतारे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवला जात आहे की, मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जातं आहे. पण असा आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, असा नालायक पणा मी कधीच करणार नाही. मी लोकसभा निवडणूक लढतोय ते जिंकण्यासाठीच… ही लढाई पवारांचा विरोधात आहे. ही लढाई खूप मोठी आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
सुनील तटकरे म्हणतात की, विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देत त्याला मी सांगतो आता… अजित पवार यांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातक्या तेव्हा तुम्ही गप्प राहिलात? शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहितीय विजय शिवतारे कोण आहेत. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे. हे लोक ग्रामीण टेरेरिझम ग्रामीण दहशतवाद या पवारांनी केला आहे, असा घणाघात विजय शिवतारे यांनी केला आहे.
माझ्या माणसानं त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल. 70 वर्षात यांनी केलं काय फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली आहे, असं विजय शिवतारे म्हणालेत.
आधी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, ती गेली. आता पवारांची कंपनी आली. शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस आहे. दोघांचा मला खात्मा करायचा आहे. यांनी लोकांवर प्रचंड अन्याय केले आहेत. कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवतारेंनी पवारांवर टीका केली आहे.